CSK Team Update | IPL सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

पोलीसनामा ऑनलाईन : CSK Team Update | 31 मार्च 2023 पासून पुरुषांच्या आयपीएलला (Men’s IPL) सुरुवात होणार आहे. हे सामने सुरु होण्याच्या अगोदर चेन्नईच्या (CSK) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा (New Zeland) अष्टपैलू खेळाडू कायली जेमिसन (Kylie Jameson) पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL) बाहेर पडला आहे. यामुळे चेन्नईच्या संघाला (CSK Team Update) मोठा धक्का बसला आहे. यानंतर कायली जेमिसनच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज सिसांडा मेगाला (Sisanda Magala) याला संधी देण्यात आली आहे. मेगालाने आपल्या संपूर्ण टी- 20 क्रिकेटच्या कारकिर्दीत 136 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने भल्याभल्यांच्या दांड्या गुल केल्या आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या SA20 लिगमध्ये मेगला चॅम्पियन खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते. त्याला चेन्नईच्या संघाने 50 लाखांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात सामावून घेतले आहे. तर कायल जेमिसनला सीएसकेने 1 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. कायल जेमिसन चेन्नईच्या संघात सामील होण्याच्या अगोदर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत होता. कायल जेमिसनच्या जागी सिसांडा मेगालाची वर्णी लागल्याचे सीएसकेनं त्यांच्या ट्वीटर हॅंडलवरून जाहीर केले आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे.

या वर्षी प्रथमच महिलांची आयपीएल सुरु करण्यात आली आहे. या आयपीएला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे.
पुरुषांप्रमाणेच महिला आयपीएलदेखील मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे.
या आयपीएलमध्ये मुबई, गुजरात, बंगलोर, दिल्ली, आणि युपी हे 5 संघ खेळत आहेत.
या टूर्नामेंटची सांगता 26 मार्च रोजी होणार आहे. यंदाची पहिली महिला आयपीएल ट्रॉफी कोणती टीम जिंकते
याकडे सर्वांचे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title :CSK Team Update | sisanda magala will play for chennai super kings in ipl 2023 kyle jamieson ruled out because of back injury

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Government Employees Strike | सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ’95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई’, यासारखी वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? – अजित पवार