चेन्नई सुपर किंग्सचा दिपक चहर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, BCCI नं IPL 2020 चं शेडयूल थांबवलं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्ज संघासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शुक्रवारी (दि.28) संघातील गोलंदाज दीपक चहरसह 10 स्टाफ सदस्यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. यामुळे संपूर्ण संघाला क्वारंटाईन करावे लागले आहे. यानंतर शनिवारी CSK ला आणखी एक धक्का बसला. संघाचा उपकर्णधार आणि प्रमुख खेळाडू सुरेश रैनानं कौटुंबिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तो यांदाची आयपीएल खेळणार नाही. त्यानंतर आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याला कोरोना झाल्याचे समोर येत आहे.

दिपक चहरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि आयपीएल 13 मधील सर्व नर्धारीत कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने या आठवड्याच्या अखेरीस आयपीएल 2020 चे वेळापत्रक जाहीर करणे अपेक्षित होते. कारण या स्पर्धेला सुरुवात होण्यास केवळ 20 दिवसांचा कालावधी राहिला आहे. आतार्पंयंत सर्व सुरळीत सुरु होते. फ्रेंचायझीने आयपीएल प्री- आयपील पूर्वीचे कॅम्प सुरु केला होता. आयपीएल कॅम्प पूर्वी सर्व खेळाडूंना कोविड-19 ची टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले होते. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा रद्द होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असताना खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने परिस्थिती सुधारल्याशिवाय कार्यक्रम जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्रांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, परिस्थिती हाळण्यासाठी पुरेशी उपाययोजना केली जात आहे आणि अचानक स्पर्धेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या घोषणेस काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आले आहे.