home page top 1

सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पूल कोसळल्यानंतरचा पहा Video

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत सहा जणांचा झाल्याचे सांगण्यात येत असून 31 जण जखमी झाले आहेत.

नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्याच वेळी या परिसरात वाहनांचीही गजबज असते. सायंकाळी दादाभाई नौरोजी मार्ग गर्दीने फुलून जातो. या मार्गावरील बी. टी. लेन येथून टर्मिनसमध्ये जाणारा हिमालय पादचारी पुलाचा साठ टक्क्यांहून अधिक भाग गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच गोंधळ उडाला.

पूल खाली पडताच पुलावरून जाणारे काही पादचारीही त्यासोबत कोसळले. हा भाग काही मोटारगाडय़ांवर कोसळून त्यांचेही नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२)  आणि मोहन कायगडे (५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सोनाली नवले (30), अध्वित नवले, राजेंद्र नवले (33), राजेश लोखंडे (39), तुकाराम येडगे (39), जयेश अवलानी (46), मोहन कायगडे (40), महेश शेरे, अजय पंडित (31), हर्षदा वाघळे (35), विजय भागवत (42), निलेश पाटावकर, परशुराम पवार, मुंबलिक जैसवाल, मोहन मोझाडा (43), आयुषी रांका (30), सिराज खान, राम कुपरेजा (59), राजेदास दास (23)  सुनील गिर्लोटकर (39), अनिकेत अनिल जाधव (19), अभिजीत माना (31), राजकुमार चावला (49), सुभाष बॅनर्जी (37), रवी लगेशेट्टी (40), नंदा विठ्ठल कदम (56), राकेश मिश्रा (40), अत्तार खान (45), सुजय माझी (28), कानुभाई सोलंखी (47), दीपक पारेख हे जखमी झाले.

Loading...
You might also like