अर्जुन-मलायकाच्या ‘त्या’ फोटोने चाहते ‘चकित’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये एकत्र एन्जॉय करत आहेत. दोघेही सोबत टाईम स्पेंड करत आहेत. त्यांचे एन्जॉय करतानाचे अनेक फोटो समोर आले आहेत. दोघांनीही आपल्या इंस्टाग्रामवरून पोस्ट टाकल्या आहेत. परंतु नुकत्याच समोर आलेल्या एका फोटोने मात्र चाहते चकित झाल्याचे दिसत आहे.

मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवरून एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिसतंय की, मलायकाने नियॉन हिरव्या रंगाचा टॉप घातला आहे आणि निळ्या रंगाची कॅपही घातली आहे. खास कॅप्शन दिलेल्या या फोटोत मलायकाने आपला चेहरा लपवला आहे असे दिसत आहे. आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये मलायका म्हणते की, “Mad hatter in nyc.,,..(p.s THE mad hatter clicked it)” मलायकाचे कॅप्शन पाहून लगेच लक्षात येते की, मलायकाचा हा फोटो अर्जुन कपूरनेच क्लिक केला आहे.

या नंतर अर्जुन कपूरचाही एक फोटो समोर आला आहे. ज्यात त्याने मलायका सारखाच हुबेहुब क्लिक करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही अर्जुनचा फोटो पाहिला तर लक्षात येईल की, अर्जुनने मलायकासारखीच पोज दिली आहे. तिच्यासारखीच मानंही थोडीशी खाली घातली आहे. या शिवाय तुम्ही अर्जुनचा पेहराव पाहिला तर दिसेल की, तो ही मलायकासारखाच आहे.

मलायकासारखीच निळ्या रंगाची कॅप आणि मलायकासारखाच नियॉन हिरव्या रंगाचा टीशर्ट त्याने घातला आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला आहे. अर्जुनच्या हातात असणारा मोबाईलही स्पष्ट दिसत आहे. अर्जुननेही आपल्या फोटोला खास कॅप्शन दिले आहे. त्याने त्याच्या नियॉन रंगाची तुलना मलायकाच्या नियॉन रंगाशी केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये विचारले आहे की, कोणाचा नियॉन रंग चांगला आहे?

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव