पुण्यात कस्टम विभागाच्या पथकाने जप्त केला ५ लाखांचा गांजा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सीमा शुल्क (कस्टम) विभागाच्या पथकाने स्विफ्ट कार आणि स्कॉर्पिओमधून नेला जात असलेला ५ लाखांचा ५३ किलो गांजा जप्त केला आहे. तर पोलिसांनी गांजा घेऊन जाणाऱ्या तीन जणांना अटक केली.

अशोक बी. पवार (रा. ता. करमाळा, जि. सोलापूर), किरण गणपत पानकर (रा. ता. मावळ जि. पुणे), सुधाकर कांबळे (रा. कात्रज, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्या

कस्टम विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांना दोन वाहनांमधून गांजा नेला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी खडकी रेल्वे स्टेशन परिसरात एका स्विफ्ट कार आणि स्कॉर्पिओ गाडीला अडवून झडती घेतली. तेव्हा त्यात हाय डेन्सीटी पॉलीथीन च्या २५ बॅग्ज असल्याचे समोर आले. दरम्यान या बॅग्जमध्ये गांजा असल्याचे समोर आले.

या गांजाचे वजन ५३ किलो ३०० ग्राम एवढे असून त्याची किंमत ५ लाख रुपये आहे. त्यानंतर पथकाने तिघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते गांजा शहरात विक्री करण्यासाठी आणला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने गांजासह ५ लाख रुपयांची वाहने असा १० लाखांचा मुद्देमाल जप्त करत त्यांच्याविरोधात एनडीपीएस अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना न्यायलयात हजर करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.