Pune SPPU News | पुणे विद्यापीठात पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण, भाजपचे आंदोलन; भाजयुमो आणि एसएफआय कार्यकर्त्यांमध्ये ‘राडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune SPPU News) भितींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत लिहिल्यामुळे भाजपकडून (BJP) आंदोलन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (BJP City President Dheeraj Ghate) यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजयुमो आणि एसएफआयचे कार्य़कर्ते यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर काही वेळातच भाजपने त्यांचे आंदोलन संपल्याचे जाहिर केले. (Pune SPPU News)

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, पुणे विद्यापीठात अशा गोष्टी होणे दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह (Amit Shah) तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (Rashtriya Swayamsevak Sangh) अपमान आम्ही सहन करणार नाही. काही गुंड प्रवृत्तीचे लोक विद्यापीठातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, याबाबत विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. महेश रघुनाथ दवंगे Professor Dr. Mahesh Raghunath Davange (वय-37 रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी 294, 500 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune SPPU News)

दोन दिवसांपूर्वी दोन संघटनांमध्ये वाद

दोन दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. विद्यापीठातील मध्यवर्ती भागातील रीफेक्ट्रीजवळ बुधवारी दुपारी हा प्रकार घडला होता. या घटनेत दोन्ही विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते जखमी झाले होते. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pradhan Mantri Kharif Pik Yojana | २५ लाख शेतकऱ्यांना १,३५२ कोटी नुकसानभरपाई;
विमा कंपन्या तयार! पावसाच्या खंडामुळे २५ टक्के लाभ

Pune News | पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच मोबाईल अ‍ॅपवर मिळणार ‘पीएमपी’चे तिकीट, लाइव्ह लोकेशन कळणार