Cyclone Nisarga Live Updates : मुंबईत आज काही तासात धडकणार ‘चक्रीवादळ’, 90-100 किमी प्रति तास झाला वार्‍याचा वेग

मुंबई : चक्रीवादळ निसर्ग आज दुपारी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. हे वादळ आज सकाळी येथून 215 किलोमीटर दक्षिण पश्चिम तसेच रायगडवजळ सुमारे 165 किमी दक्षिण- दक्षिणपूर्वमध्ये अरबी समुद्रावर पसरलेले आहे. एनडीआरएफने सांगितले की, अलिबागमध्ये 1,500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

मुंबईत कलम 144 लागू

मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाने सांगितले की, चक्रीवादळाची दखल घेऊन शहरात कलम 144 अंतर्गत प्रतिबंध जारी करण्यात आले आहेत. तर मुंबई महापालिकेने म्हटले, लोकांनी पावसादरम्यान बाहेर पडू नये, मुसळधार पावसात कार घेऊन बाहेर पडायचे असेल तर गाडीत हातोडी किंवा अशाप्रकारची वस्त घेऊन जावे, कारण कारचे दरवाजे, काचा जाम झाल्यास बाहेर येण्यासाठी मदत होऊ शकते.

वार्‍याचे वेग 90-100 किमी प्रति तास

चक्रीवादळ निसर्ग पहिल्यापेक्षा आणखी वेगवान झाले आहे. आता वार्‍याची गती 85-95 किमी प्रति तासावरून वाढून 90-100 किमी प्रति तास झाली आहे. वादळ 110 मैल प्रति तास वेगाने पुढे सरकत आहे. ही माहिती भारत सरकारने दिली आहे.

लोकांनी घरातच राहावे : डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटले की, चक्रीवादळ निसर्ग धोकादाय वादळ आहे. ते 5.30 वाजता पूर्व अरबी समुद्रात सुमारे 165 किमी दक्षिण-पश्चिममध्ये अलिबाग आणि मुंबईपासून 215 किमी दक्षिणमध्ये केंद्रीत झाले आहे. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्‍यावर काही तासातच जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासाठी लोकांनी घरातच राहावे. किनारी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे.

मुंबई, गुजरात, रायगडमध्ये पोहचली एनडीआरएफची पथके

एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले की, एनडीआरएफची टीम आज सकाळी रायगडच्या किनार्‍यावर पोहचली आहे. तसेच एनडीआरएफची पथके आंध्रच्या विजयवाडाहून डहाणू, पालघरच्या किनार्‍यासह मुंबईत पोहचली आहेत. याशिवाय एनडीआरएफची टीम गुजरातच्या खंबाट किनार्‍यावर आज सकाळी पोहचली आहे. जेथे ते चक्रीवादळादरम्यान आपले कर्तव्य पार पाडतील.

रेल्वेेने पाच ट्रेनचे वेळापत्रक बदलले

चक्रीवादळ निसर्गच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई टर्मिनलहून रवाना होणार्‍या पाच रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. तर दोन ट्रेन ज्या मुंबई टर्मिनलवर येणार होत्या, त्यांना थांबवण्यात आले आहे आणि एका ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या किनार्‍यावर निसर्ग पोहचणार

भारतीय हवामान विभागाने सांगितले की, चक्रीवादळ निसर्ग मागील 6 तासादरम्यान 13 किमी प्रति तास वेगाने उत्तर महाराष्ट्राच्या किनार्‍यावर पोहचेल. हे अलिबागच्या 155 किमी दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि मुंबईपासून 200 किमी दक्षिण-दक्षिण पश्चिममध्ये आहे.

कोळीवाडा आणि अलिबागमधून लोकांना बाहेर काढले

एनडीआरएफच्या पथकांनी महाराष्ट्रातील कोळीवाडे आणि अलिबागमधून बुधवारी सकाळी लोकांना बाहेर काढले. ही माहिती एनडीआरएफचे महासंचालक प्रधान यांनी दिली.

अचानक वाढला हवेचा वेग

हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत आज अचानक हवेचा वेग वाढला. येथे 22 किमी प्रति तास वेगाने वारे वहात आहेत.

प्रशासनासह एनडीआरएफ अलर्ट

वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 20 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये मुंबईत 8 टीम, रायगडमध्ये 5 , पालघरमध्ये 2 टीम, ठाणे येथे 2 टीम, रत्नागिरीत 2 टीम आणि सिंधुदुर्गात 1 टीम तैनात करण्यात आली आहे.

चक्रीवादळ निसर्गने आपला मार्ग मुंबईच्या दिशेने वळवला आहे. आता ते वेगाने पुढे सरकत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दिसू लागला आहे. मुंबई, पालघर, अलिबाग आणि ठाणे सह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागानुसार वादळ सकाळी मुंबईपासून दूर 94 किलोमीटरवर अलिबाच्या किनार्‍यावर धडकेल.

मोठ्या प्रमाणात विध्वंसाची शक्यता असल्याने सरकार आणि प्रशासन अलर्ट झाले आहे. महाराष्ट्र, गुजरात, केंद्र शासित दमन-दीव, दादरा आणि नगर हवेलीमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील रायगड आणि पालघरमधील न्यूक्लियर आणि केमिकल संयंत्रांची सुरक्षा लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

पीएम मोदींनी घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी ट्विट करून लोकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एनडीआरएफच्या 33 टीम तैनात केल्या आहेत.

हवामान विभागाने सांगितले की, चक्रीवादळादरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल. तसेच समुद्रात दोन मीटर उंचीच्या लाटा येऊ शकतात. तसेच सखल भागात पुरस्थितीची शक्यता आहे. यासाठी एनडीआरएफसह नौदल, तटरक्षक दलासह सर्व दलांना अलर्ट करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड़, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.

129 वर्षानंतर मुंबईच्या किनार्‍यावर चक्रीवादळ

129 वर्षानंतर मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर चक्रीवादळ येत आहे. हवामान विभागाच्या सायक्लोन ई-अ‍ॅटलसनुसार 1891 मध्ये समुद्र वादळ आले होते. त्यानंतर प्रथमच आरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळाची स्थिती आहे.