Cylinder Price : 62 रुपयांनी ‘स्वस्त’ झालं घरगुती गॅस सिलेंडर, आजपासून नवीन दर लागू

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – विना अनुदानित एलपीजी सिलेंडर (14.2 किलो) 62 रुपयांनी स्वस्त झाले आहे. एप्रिलमध्ये ग्राहकांना सिलेंडरसाठी 779 रुपये द्यावे लागणार आहे. सलग दुसर्‍या महिन्यात सिलेंडरच्या किंमतीमध्ये घसरण होत आहे. बुधवारी सकाळपासून हे नवीन दर लागू झाले आहेत.

आयओसीचे जनरल मॅनेजर (एलपीजी) अरुण प्रसाद म्हणाले की, तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडर्स (19 किलो) मध्येही 96 रुपये कमी केले आहेत. कमर्शिअल सिलेंडरची किंमत आता 1369.50 रुपये आहे. पाच किलो सिलेंडरही 21.50 रुपयांनी कमी करून 286.50 रुपये झाला आहे.

खात्यामध्ये 263 रुपये अनुदान दिले जाईल
एलपीजी सिलेंडर्सच्या बाजारभावामध्ये (अनुदान नसलेले दर) कपात झाल्यानंतर आता 233 रुपये ग्राहकांच्या खात्यात अनुदान म्हणून जातील. यानंतर ग्राहकांना अनुदानित सिलेंडरची किंमत जवळपास 516 रुपये पडेल.

सिलेंडर         एप्रिलमध्ये किंमत
14.2 किलो      779.00
5 किलो          286.50
19 किलो       1369.50

12 सिलेंडरवर सरकार अनुदान देते
सध्या सरकार एका वर्षामध्ये प्रत्येक घरासाठी 14.2 किलोचे 12 सिलेंडर्सवर अनुदान देते. जर तुम्हाला यापेक्षा जास्त सिलेंडर हवे असतील तर तुम्हाला ते बाजारभावाने खरेदी करावी लागेल. सरकार दरवर्षी 12 सिलेंडरवर जे अनुदान देते त्याची किंमत देखील दर महिन्याला बदलत असते. सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परकीय चलन दरात बदल यासारख्या घटक अनुदानाची रक्कम निश्चित करतात.