DA Arrear | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! मार्च 2022 च्या सॅलरीसोबत मिळेल 38,692 रुपयांचा एरियर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – DA Arrear | केंद्रीय कर्मचार्‍यांचा (Central Government Employees) होळीचा आनंद द्विगुणीत होणार आहे. मार्चमध्ये सध्याच्या पगारासह 3 टक्के ‘डीए’चा लाभही त्यांना मिळणार आहे. म्हणजे मार्च महिन्याच्या पगारापासून त्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता Dearness allowance (DA) दिला जाईल. पण, यात विशेष बाब म्हणजे याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासून करण्यात आली आहे. (DA Arrear)

 

2 महिन्यांची थकबाकी मिळेल
म्हणजेच केंद्रीय कर्मचार्‍यांना जानेवारी 2022 पासूनच 34 टक्के दराने पैसे मिळतील. त्यांना मार्च महिन्याच्या पगारात पूर्ण रक्कम दिली जाईल. केंद्रीय कर्मचार्‍यांना जानेवारी, फेब्रुवारी (2 महिन्यांची) थकबाकीही मिळेल.

 

मार्चच्या पगारात जमा होतील पैसे
केंद्रीय कर्मचार्‍यांना मार्च महिन्याचा पगार पूर्ण दिला जाईल. म्हणजे सर्व पैसे त्यांना होळीनंतर मिळतील. महागाई भत्त्यात (DA Hike) 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी 2022 च्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याने, थकबाकी (DA Arrear) देखील मिळेल. केंद्रीय कर्मचार्‍यांना 34 टक्के डीएसह थकबाकीही दिली जाईल.

किती येईल 2 महिन्यांचा एरियर?
केंद्रीय कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 18,000 ते 56,900 रुपये आहे. जर 34 टक्के नवीन महागाई भत्ता 56,900 रुपयांच्या कमाल मूळ पगारावर मोजला, तर 19,346 रुपये प्रति महिना डीए होतो. त्याच वेळी, आतापर्यंत जे पेमेंट केले गेले आहे ते 31 टक्के दराने 17,639 रुपये प्रति महिना केले गेले आहे.

 

38,692 रुपये मिळतील
म्हणजे कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात दरमहा 1,707 रुपयांनी वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर ही वाढ 20,484 रुपये असेल. 2 महिन्यांची थकबाकी मार्च महिन्यात मिळणार आहे. अशा स्थितीत हिशोब केला तर एका कर्मचार्‍याला 38,692 रुपये थकबाकी मिळेल.

 

18000 मूळ पगारावर इतका वाढेल DA
जर 18,000 रूपये किमान मूळ वेतन रुपयांवर थकबाकीची गणना केली तर सध्या कर्मचार्‍याला 5,580 रुपये डीए मिळत आहे, जो 31 टक्के डीएनुसार आहे. आता त्यात 3 टक्केचा समावेश केला तर 6,120 रुपये मिळतील.

 

दुसर्‍या सॅलरीवर असे होईल कॅलक्युलेशन
म्हणजेच कर्मचार्‍यांच्या पगारात 540 रुपयांची वाढ होणार आहे. 2 महिन्यांची थकबाकी सुमारे 1,080 रुपये होईल. अशाचप्रकारे, दुसर्‍या सॅलरीच्याच्या ब्रेकअपवर डीए एरियरचे कॅलक्युलेशन होईल.

 

Web Title :- DA Arrear | da-arrear-7th pay commission latest news today central government employees dearness allowance rs 38692 after holi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Election 2022 | पुणे महापालिका निवडणूक ! प्रारुप प्रभाग रचनांवर हरकतींचा ‘पाऊस’, तब्बल 3 हजार 596 नागरिकांच्या हरकती व सूचना; वानवडी- रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयात सर्वाधीक हरकती

 

Pune Crime | PMPML बसमध्ये चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड; सहकारनगर पोलिसांकडून मुद्देमाल जप्त

 

Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात स्थायी समितीची कोट्यवधींची उड्डाणे ! 400 कोटींच्या निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे