मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सोमवारी संध्याकाळी केलेल्या ट्विटवरुन मंगळवारी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) मंत्री दादा भुसेंवर (Dada Bhuse) आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणारं एक ट्विट केलं होतं. यावर दादा भुसेंनी आज विधानसभेत निवेदन सादर केले. परंतु निवेदन सादर करताना दादा भुसेंनी (Dada Bhuse) शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख केल्याने विरोधकांनी यावर आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावरुन संतप्त प्रतिक्रिया देत दादा भुसेंना खडेबोल सुनावले.
संजय राऊतांचं ट्विट
संजय राऊत यांनी सोमवारी रात्री कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केले. दादा भुसे यांच्या गिरणा अॅग्रो कंपनीत (Girna Agro Company) मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ट्विटमध्ये राऊतांनी लिहलं आहे की, हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल. त्यावर निवदेन देताना दादा भुसेंनी थेट शरद पवार यांचा उल्लेख केल्यामुळे विरोधक संतप्त झाले.
हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले.
ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल.@dir_ed@Dev_Fadnavis pic.twitter.com/fYuLIZEhEL— Sanjay Raut (@rautsanjay61) March 20, 2023
काय म्हणाले दादा भुसे?
दादा भुसे यांनी सभागृहात संजय राऊतांचे ट्विट वाचून दाखवलं. त्यानंतर राऊतांवर टीका करताना म्हणाले, आम्हाला गद्दार म्हणाले. मात्र आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले. त्यांनी ट्विट केलं, जर त्यात तथ्य असेल तर कारवाई करावी नाहीतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या (NCP) शरद पवार यांची चाकरी करतात. त्यांनी माफी मागावी नाही तर त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया भुसे यांनी राऊतांच्या ट्विटवर दिली.
अजित पवार आक्रमक
दादा भुसेंच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात करताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण दादा भुसेंनी त्यांची भूमिका मांडताना आमचे राष्ट्रीय नेते शरद पवारांचा उल्लेख करण्याचं काडीचंही कारण नव्हतं. शरद पवार 55 वर्षे समाजकारण-राजकारण करतात. नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) शरद पवारांविषयी काय म्हटलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं असताना दादाजी भुसे, तुमच्याकडून तर ही अपेक्षा अजिबात नव्हती. तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. दिलगिरी व्यक्त करा. आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत. नाहीतर आम्हाला वॉकआऊट करावं लागेल, असा इशारा अजित पवारांनी दिला.
मी वाईट बोललो नाही – दादा भुसे
अजित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिलं.
दादा भुसे म्हणाले, मी शरद पवार यांच्यासंदर्भात काही वाईट बोललो नाही.
मी शरद पवार यांची चाकरी करतात एवढेच बोललो. अध्यक्ष तुम्ही तपासुन पहा. मी चुकीचं बोललो नाही.
विधानसभा अध्यक्ष म्हणाले…
दरम्यान, या सर्व प्रकरणावर दोन्ही बाजूंनी आक्रमक प्रतिक्रिया आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) म्हणाले, दादा भुसेंचं निवदेन तपासून त्यात काही चुकीचं असेल तर ते आजच्या दिवसाचं कामकाज संपण्यापूर्वी कामकाजातून काढून टाकेन, असे सभागृहात जाहीर केले.
Web Title :- Dada Bhuse | ajit pawar gets angry on dada bhuse reference sanjay raut sharad pawar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update