FASTag ची चोरी, डॅमेज किंवा फाटल्यावर काय करायचे ? घरबसल्या दूर करा या समस्या, जाणून घ्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देशात फास्टॅग लागू झाले आहे. परंतु लोकांना फास्टॅगसंबंधी अनेक अडचणी येत आहेत. जसे की फास्टॅग चोरी होणे, हरवणे, डॅमेज आणि फाटल्यानंतर काय करावे, असा प्रश्न पडतो. याशिवाय फास्टॅग खराब किंवा चोरी झाल्यास वॉलेटमधील पैसे सुरक्षित राहणार किंवा नाही? पुन्हा फास्टॅग घेण्यासाठी काय करावे लागेल, आणि यावर किती खर्च येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला येथे देणार आहोत.
देशभरात सर्व गाड्यांवर फास्टॅग लावणे जरूरी झाले आहे. फास्टॅग गाडीच्या विंडस्क्रीनवर लावावा लागतो. तो लावण्यानंतर टोल प्लाझावरून जाताना येथील कॅमेरे तो स्कॅन करतात. यानंतर टोलची रक्कम तुमच्या अकाऊंटमधून आपोआप कापली जाते. ही प्रक्रिया काही सकेंदात पूर्ण होते. आता याच्याशी संबंधीत समस्यांबाबत जाणून घेवूयात…
रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयानुसार, एका वाहनासाठी केवळ एक फास्टॅग मिळतो. जर फास्टॅग डॅमेज झाला तर तुम्ही सहज तो बदलू शकतो. कारण एका गाडीसाठी केवळ एक फास्टॅग नंबर जारी होतो, ज्यामध्ये व्हेईकलचे नाव, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), टॅग आयडीसह अन्य डिटेल्स भराव्या लागतात. अशावेळी केवळ जुन्या डिटेल देऊन पुन्हा फास्टॅग इश्यू केला जाऊ शकतो.
जर तुमचा फास्टॅग काम करत नसेल तर तुम्ही घर बसल्या खराब झालेला फास्टॅग बदलू शकता. यासाठी तुम्ही पेटीएमद्वारे नवा फास्टॅग मिळवू शकता. यासाठी 100 रुपये चार्ज वसूल केला जातो. तुम्ही अॅपच्या माध्यमातून गाडीचे आरसी आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर देऊन पुन्हा फास्टॅग मागवू शकता.
काही लोकांच्या मनात प्रश्न असतो की हा फास्टॅग कधीपर्यंत चलेल? फास्टॅगमध्ये असलेल्या कॅशची वैधता अनलिमिटेड असते. म्हणजे जेव्हा फास्टॅग बदलावा लागेल तेव्हा पैसे नव्या फास्टॅगमध्ये ट्रान्सफर होतील. फास्टॅगला माय फास्टॅग अॅप किंवा नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, यूपीआय, पेटीएम आणि अन्य लोकप्रिय पद्धतीने रिचार्ज करता येते. या अॅपद्वारे फास्टॅग बदलू शकता.
गाडी चोरी झाल्यास बँकेच्या हेल्पलाइनवर फोन करूनच फास्टॅग ब्लॉक करू शकता. गाडीची काच तुटल्यास फास्टॅग खराब झाल्यास, तो बदलू शकता. जर तुम्ही स्वता बँकेत किंवा फास्टॅग सेंटरमध्ये जाऊन गाडीचे आरसी आणि इतर कागदपत्र दाखवलेत तर कोणतेही चार्ज लागत नाहीत.
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फास्टॅगसाठी अॅप्लाय करता, त्यावेळी एक फास्टॅग अकाऊंट जेनरेट होते, जे नेहमीसाठी असते. हे फास्टॅग खाते ऑनलाइन किंवा फास्टॅग अॅपद्वारे अॅक्सेस करता येते. यासाठी कधीही फास्टॅग बदलल्यास जुन्या अकाऊंटच्या डिटेल्स पडताळून नवे फास्टॅग जारी केले जाते.