धक्कादायक…! लग्नात हवेत गोळीबार ,डान्सर तरुणीचा मृत्यू 

पाटना : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एका लग्नात धक्कादायक घटना घडली आहे. तेथील सहरसा जिल्ह्यात लग्नसमारंभात आनंदाच्या भरात एकाने हवेत गोळीबार केला. पण ती गोळी स्टेजवर नाचणाऱ्या तरुणीच्या डोक्याला लागली आणि पाहताक्षणी ही तरुणी खाली कोसळली. या घटनेत या डान्सर तरुणीचा मृत्यू झाला आहे. मधू उर्फ़ आकृती असे या तरुणीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बिहारमधल्या सहरसा जिल्ह्यातल्या विराटपुर या गावातील एका लग्न समारंभात डान्सर मधू उर्फ़ आकृती एका भोजपुरी गाण्यावर नृत्य करीत होती. त्याचवेळी लग्नाला आलेले काही लोक नोटांचे बंडल हवेत उडवून त्यावर गोळी मारत होते. त्याचवेळी एका इसमाने नोटांचा बंडल हवेत उडवला ,तो इसम त्यावर गोळीबार करीत होता,पण त्याच्या बंदुकीतून सुटलेली गोळी थेट डान्सर मधुच्या डोक्यात घुसली. गोळी लागताच मधु जागेवरच कोसळली.

या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केली आहे. याप्रकरणी विराटपुराच्या पोलीस अधीक्षकांनी सोनवर्षा पोलीस ठाण्याचे फौजदार सुमन कुमार यांना तात्काळ निलंबित केले आहे.