सावधान ! ‘कोरोना’ काळादरम्यान लहान मुलांमध्ये 20 टक्क्यांनी वाढल्या डोळ्यांच्या समस्या

सध्या कोरोनाचे संकट सुरू असून लोक कमीत कमी बाहेर पडत आहेत. लहान मुले तर लॉकडाऊन पूर्वीपासून घरातच आहेत. त्यांच्यासाठी बाहेरचे जगच जवळपास बंद झाल्याने त्यांच्यावर अनेक परिणाम दिसून येत आहेत. शिक्षण सुद्धा ऑनलाइन सुरू आहे. घरात असल्याने मुलं जास्तीत वेळ ऑनलाईन क्लासेस, स्मार्टफोनवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे यावर घालवत आहेत. या गॅझेटच्या अतिवापराने त्यांच्यात 20 टक्क्यांनी डोळ्यांच्या समस्या वाढल्याचे आढळून आले आहे.

या आहेत समस्या
1 डोळ्यांचा कोरडेपणा
2 डोळ्यांना खाज सुटणे
3 डोळ्यांच्या कडा लाल होणे
4 डोळ्यांमधून कृत्रिम अश्रू येणे

हे लक्षात ठेवा

1 डिजिटल अभ्यासक्रम, तासनतास टीव्ही, स्मार्ट फोन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापरामुळे लहान मुलांना डोळ्यांचे विकार वाढले आहेत.

2 ऑनलाईन शिक्षण घेणे आवश्यक असले तरी गॅजेट्स वापर कसा आणि किती वेळ करावा, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.

3 गॅझेटच्या अतिवापरामुळे सतत डोळे चोळण्याने मुलांचे कॉर्निया पातळ होऊ शकतात.

4 मुलांची दृष्टी कायमस्वरूपी कमी होऊ शकते.

5 डोळे चोळण्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर विशिष्ट दबाव वाढल्याने दृष्टिदोष उद्भवण्याची शक्यता आहे.

6 पुरेशी झोप आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरावर मर्यादा आणणे फायदेशीर ठरते.

7 स्क्रीन टाईम कमी करून मुलांना संतुलित आहार द्या.

8 योग्य झोप, स्क्रीन टाईम कमी करणे, पोषक आहार याद्वारे समस्या टाळता येतील.