पुण्यातील दापोडीत एटीएम लुटण्यासाठी आलेले ५ जण जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दापोडी येथील एटीएमवर दरोडा टाकून ते लुटण्यासाठी आलेल्या ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रविण भगवान पवार (वय ३५, रा. म्हाडा सोसायटी, वारजे माळवाडी), राजू आरमोघम पिल्ले (वय ३९, रा. कमलाबाई बहिरट चाळ, बोपोडी), संतोष जनार्धन बोबडे (वय ३६, रा़ बोपोडी), पुष्कर किशोर मालु (वय २३, रा. मंत्री रेसिडेन्सी, औंध रोड) आणि मुज्जु मेहबुब शेख (वय २५, रा. बोपोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

भोसरी पोलीस गस्त घालत असताना मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरुन ते बोपोडीकडून दापोडीकडे जात होते. पोलिसांना पाहताच ते वेगाने जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडून झडती घेतली असता त्यांच्या व्हेस्पा गाडीच्या डिकीत कोयता, दुसऱ्या गाडीत कोयता, पाच मास्क आढळून आले. त्यांची झडती घेतली तेव्हा राजू पिल्लेच्या खिशात मिरची पुड तर, प्रविण पवार याच्या पाठीमागे बनियनच्या आत एक लोखंडी तलवार लपवून ठेवली असल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर दापोडी येथील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएमवर दरोडा टाकून ते लुटण्यासाठी ते जात असल्याचे त्यांनी सांगितले.

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

You might also like