Dark Underarms Home Remedies | Dark Underarms मुळे लग्नात स्लीव्हजलेस घालणे होते कठीण, जाणून घ्या कसा दूर होईल अंडरआर्म्सचा काळेपणा…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | अनेक महिला लग्नसमारंभ किंवा पार्ट्यांमध्ये स्लीव्हलेस कपडे घालण्यासाठी शौकीन असतात (Dark Underarms Home Remedies). परंतु अंडरआर्म्स डार्क असल्याने स्लीव्हलेस कपडे घालण्याची आपली इच्छा होत नाही. कारण काखेतील काळेपणा अनेकदा लाजिरवाणा ठरतो, कारण तेथील काळेपणा चांगला दिसत नाही (Dark Underarms Home Remedies).

जाणून घेऊया काळ्या अंडरआर्म्सपासून मुक्त कसे व्हावे?

घामामुळे काखेत घाण जमा होण्यास सुरुवात होते. आणि आपले अंडरआर्म्स काळे होतात. तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता (Dark Underarms Home Remedies).

  1. खोबरेल तेल (Coconut Oil)

खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत, खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई (Vitamin E) मुबलक प्रमाणात आढळते. खोबरेल तेल रोज आपल्या काखेत लावावे (Black Underarms) आणि काही वेळ असेच राहू द्या. नंतर ते पाण्याने स्वच्छ करा, याचा प्रभाव काही दिवसात दिसून येईल. याने आपली काख गोरी होण्यास मदत होईल.

  1. लिंबाचा रस (Lemon Juice)

लिंबामध्ये अनेक गुणधर्म आहेत. यामध्ये सायट्रिक एसिड असते. लिंबाच्या रसाचा वापर अंडरआर्म्सपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी आंघोळ करण्यापूर्वी लिंबू अर्धे कापून काखेतील काळ्या भागावर चोळा. यामुळे अंडरआर्म्स नैसर्गिकरित्या ब्लीच (Natural Bleach) होण्यास मदत होईल.

  1. ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

ऍपल सायडर व्हिनेगर अंडरआर्म्स मधील मृत पेशी (Dead Cells) काढून टाकण्याचे काम करते. कारण त्यात सौम्य ऍसिड असतात, जे नैसर्गिक क्लिनर (Natural Cleaner) म्हणून काम करतात. बेकिंग सोड्यासोबत सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा आणि काखेत लावा. नंतर कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

  1. ऑलिव्ह ऑइल (Olive Oil)

ऑलिव्ह ऑइल हे त्वचेसाठी उत्कृष्ट औषध मानले जाते.
सर्व प्रथम, एक चमचा ऑलिव्ह तेल आणि एक चमचा
ब्राऊन शुगर मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा.
आता ही पेस्ट गडद भागावर घासून काही वेळ राहू द्या,
नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गुडघेदुखीपासून आराम मिळवायचा असेल, तर करा ‘या’ उपायांचा अवलंब..

वाइन शॉपमध्ये चोरी, रोख रक्कम, दारुचे बॉक्स लंपास

हिवाळ्यात रूम हीटर वापरा जपून, नाहीतर एका चूकीमुळे जाऊ शकतो तुमचा जीव…