Daughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल मुलीला बनवलं IAS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्रजीमध्ये असे म्हणतात की, ‘Behind every great daughter is a truly amazing father’ प्रत्येक महान मुलीच्या मागे खरोखरच एका वडिलांचा हात असतो. असे म्हटले जाते की, मुली आपल्या वडिलांच्या अधिक जवळ असतात, अशा परिस्थितीत प्रत्येक वडिलांची अशी इच्छा असते की, आपल्या मुलीने खूप अभ्यास करुन भविष्यात पुढे जावे. आज, देशभरात ‘डॉटर्स डे’ साजरा केला जात आहे, यानिमित्ताने आम्ही तुम्हाला अशा वडिलांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या मुलीला आयएएस करण्यासाठी खूप संघर्ष केला. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

यावर्षी यूपीएससी 2019 चा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये मिस इंडियाच्या माजी फायनलिस्ट ऐश्वर्या शियोरनचे नाव देण्यात आले होते. या परीक्षेत तिने 93 वा रॅंक मिळविला होता. ऐश्वर्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, परंतु या प्रवासात तिचे वडील कर्नल अजय कुमार यांनी पूर्ण सहकार्य केले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना कर्नल अजय कुमार यांनी आपल्या मॉडेल कन्याची यूपीएससी परीक्षेची तयार कशी केली ते सांगितले. सध्या कर्नल अजय एनसीसी तेलंगणा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत.

अजय कुमार म्हणाले की, वडिलांचे आयुष्य आपल्या मुलीमध्येच असते. माझी मुलगी लहानपणापासूनच हुशार आहे. तिचे व्यवस्थापन कौशल्य आश्चर्यकारक आहे. जेव्हा ती छोटी होती आणि तिच्या खोलीत सर्वकाही व्यवस्थित तिच करायची. मला तेव्हाच समजले की, तिच्यामध्ये एक विशेष प्रकारची क्षमता आहे जी ती आयुष्यात पुढे घेऊन जाऊ शकते. अजय म्हणाले की, मी आर्मीतून आहे, सुरुवातीला माझी इच्छा होती की, माझ्या मुलीने खेळात करियर बनवावे, पण ऐश्वर्यासाठी नशीब काही वेगळेच होते, त्यानंतर मी माझ्या मुलीला सर्व गोष्टीत साथ दिली. माझ्या मुलीच्या इच्छेविरुद्ध मी कधीही काहीही लादलेले नाही.

अजय म्हणाले की, 2017 मध्ये जेव्हा ऐश्वर्याने श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी पूर्ण केली तेव्हा तिने मला सांगितले- ‘पप्पा, मला काही काळ मॉडेलिंग करायचे आहे’. मला माहित आहे की आम्ही अजूनही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत आणि ही कारकीर्द म्हणून हे क्षेत्र पाहण्यास आम्ही संकोच करतो, पण मला वाटले की, मुलीला हे करायचे असेल तर मी नक्कीच त्यास समर्थन देईन. मी माझ्या मुलीला मॉडेलिंग करण्याची परवानगी दिली.

कर्नल अजय म्हणाले की, मी मॉडेलिंगसाठी मुलीला हो म्हणालो होतो, पण माझ्या मुलीने माझ्यासमोर एक अट ठेवली, ती म्हणाली, जेव्हा संपूर्ण कुटुंब मुंबईत शिफ्ट होईल तेव्हाच मी मॉडेलिंग करेन, मी लगेचच तिला हो बोललो आणि स्वप्नांच्या निमित्ताने आम्ही मुंबईत शिफ्ट झालो.

कर्नल अजय म्हणाले की, माझ्या मुलीने मला सांगितले की, काही काळ मला छंद म्हणून मॉडेलिंग करायचे आहे, यासाठी मी तिला कधीही रोखले नाही. मुलीच्या फायद्यासाठी आम्ही मुंबईला जायला तयार होतो. 2017 पासून, मी माझ्या कुटूंबासह मुंबईत राहत आहे, तिथे ऐश्वर्याने काही काळ मॉडलिंग केली.

एक दिवस माझी मुलगी मला म्हणाली, ‘पप्पा, आता मला आयएएसची तयारी करायची आहे’. या निर्णयामध्येही मी त्यांचे पूर्ण समर्थन केले. कारण मला माहित आहे की ऐश्वर्या सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार आहे. ती हे करेल. अजय म्हणाले की, आम्ही तयारीचा एक नमुना बनविला, मला माहित आहे की तिने फार काळ हिंदी विषयाचा अभ्यास केला नाही. त्यासाठी मी तिला जेवणाच्या टेबलावर तयार करायचो. ती सकाळी उठून वाचत असे. अशा परिस्थितीत मी सकाळी तिच्याबरोबर उठत असे.

अजय म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांच्या यूपीएससीच्या प्रश्नपत्रिकेची फोटो डाऊनलोड करत होतो. ज्यामुळे ऐश्वर्याच्या अभ्यासास मदत होईल. त्यांनी सांगितले की, ऐश्वर्याला ऑनलाईन वाचणे आवडत नाही. म्हणूनच, मी आवश्यक विषय डाउनलोड करायचो आणि त्याची प्रिंट काढायचो. आज माझी मुलगी परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिने 93 रॅंक मिळविला आहे. वडिलांसाठी याच्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो.