दौंड रेल्वेस्थानक पुणे विभागाला जोडा, खा.सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड रेल्वे स्थानक सोलापूर ऐवजी पुणे विभागाला जोडावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. याबरोबरच दौंड रेल्वेला उपनगराचा दर्जा देण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

दौंड येथून रोज पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक असल्याचे सुळे यांनी यावेळी लक्षात आणून दिले. याशिवाय बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या मालकीच्या जमिनींचा मुद्दाही त्यांनी उपस्थित करत दौंडमधील हजारो कर्मचारी, शेतकरी आणि सर्वसामान्य दौंडकरसुद्धा बाजारपेठ व इतर कामांसाठी पुण्याला प्राधान्य देतात. तर शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थीही रोज दौंड ते पुणे हा प्रवास रेल्वेनेच करतात. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडल्यास त्यांच्या अडचणी आणि प्रश्न तातडीने सुटणे सोपे होणार आहे. दौंड रेल्वे स्थानक पुणे शहरापासून आणि पुणे विभागीय कार्यालयापासून जवळ आहे. याठिकाणी येणाऱ्या अडचणी किंवा काही अनुषंगिक कामे करण्यासाठी पुण्यातील अधिकाऱ्यांना वेळेत पोहोचणे शक्य होते. त्यामुळे हे स्थानक पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

# चौकट : जमिनींबाबत निर्णयाचा अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना द्या…

रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर विकासकामे आणि योजना राबविण्याचे अधिकार विभागिय अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. रेल्वेच्या जागेवरील प्रस्तावित विकासकामे, स्थानकांचे सुशोभीकरण, अतिक्रमणांचे प्रश्न, स्थानकालगत असलेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न यांवर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. तथापि याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना अधिकार नसल्याने ही कामे करण्यास विलंब होतो. त्यामुळे विभागीय अधिकाऱ्यांना अधिकार दिल्यास कामे वेळेत मार्गी लागण्यास मदत होईल अशी मागणी त्यांनी केली.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी