दौंड : वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून दौंडच्या भीमा नदी पात्रात वाळू माफियां हायड्रोलिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा करत होते. त्यांनतर नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या महसूल पथकाकडून दौंड तालुक्यातील शिरापूर हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तेरा यांत्रिक हायड्रोलिक बोटी उध्दवस्त करण्यात आल्या. हि कारवाई दौंडच्या पूर्व भागातील शिरापूर, मलठण, राजेगाव, वाटलूज नायगाव, खानोटा या गावांच्या हद्दीत करण्यात आली.

वाळू माफियांकडून दिवसरात्र वाळू उपसा करण्यात येत होती.याचा त्रास नदीलगतच्या शेतकऱ्यांना होत होता. दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी त्यावर अ‍ॅक्शन घेत कारवाई सुरु केली आहे. तसेच दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी होती. त्यांनतर ही कारवाई करण्यात आली.

तहलसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे, मंडल अधिकारी अजित मोहिते, सुनील जाधव, विजय खारतोडे तसेच देऊळगाव राजे, दौंड, वरवंड मंडलातील तलाठी यांच्या पथकाकडून शिरापूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 10 फायबर व 3 सेक्शन अशा एकूण 13 यांत्रिक बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या.