‘एवढ्या’ कोटींना झाला दाऊदची बहिण हसीनाच्या मुंबईतील फ्लॅटचा लिलाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या मुंबईतील नागपाडा भागातील फ्लॅटचा लिलाव झाला असून हा फ्लॅट 1.80 कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. या फ्लॅटचा लिलाव हा सफीमा कायद्यांतर्गत करण्यात आला आहे.

एसएएफइएमए आणि एनडीपीएस विभागाने या फ्लॅटचा लिलाव केला. या फ्लॅटच्या लिलावावेळी 1.69 कोटी रुपयांपासून बोली लागण्यास सुरुवात झाली होती. फ्लॅटच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 मार्च होती. लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी 30 लाख रुपये जमा करावे लागणार होते. या फ्लॅटची किंमत 1.96 कोटी रुपये ठेवण्यात आली होती. 2014 साली सीबीआयने हा फ्लॅट जप्त केला होता. याआधी 1997 सालीदेखील सीबीआयने या फ्लॅटवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

दाऊदची बहिण हसीना हिचा 2014 साली मृत्यू झाला. त्याआधी ती नागपाडाच्या या फ्लॅटमध्ये राहत होती. हसीना पारकर याच फ्लॅटमधून आपला कारभार चालवायची. दरम्यान हसीनाच्या मृत्यूनंतर हे प्रकरण सुप्रिम कोर्टात गेले होते. यानंतर आता या फ्लॅटचा लिलाव झाला असून 1.80 कोटी रुपयांना या फ्लॅटची विक्री झाली आहे.