पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटकडून जगाला मिळणार ‘मेड इन इंडिया’ Covidshield

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावर लस तयार करीत आहे. सीरम कंपनीला डीसीजीआयकडून दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्याच्या क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्रा जेनेका कोव्हिड-19 लस यांच्यासोबत ही सीरम लस तयार करणार आहे. या लसीचे नाव कोव्हिशिल्ड असणार आहे.

सीरम इंस्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अदार पूनावाला यांनी ही लस मोठ्या प्रमाणात भारतात तयार केली जाणार असल्याचा दावा केला आहे. ही लस प्रति मिनिटांत 500 वॅक्सिन डोस तयार करणार आहे. दरम्यान किती प्रमाणात ही लस तयार केली जाणार आहे याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही आहे. सीरम इंस्टिट्यूट कंपनी ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांसोबत मिळून कोरोनावर लस तयार करणार आहे. ही लस एक्स्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्यावतीने तयार केली जात आहे.

सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसर्‍या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. तर, रशिया देशातील आपल्या प्रायोगिक कोरोना लसीच्या 3 कोटी डोसची तयारी करत आहे. एवढेच नव्हे तर या लसीचे 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा मॉस्कोचा मानस आहे.