सॅटर्डे नाइट पार्टी ‘रंगात’ आल्यानंतर चालू होता ‘धांगडधिंगा’, अचानक धडकल्या महिला पोलिस उपायुक्त, 100 हून अधिक मुले-मुली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – सीताबर्डी तसेच अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत चालणा-या आणि मोठ्या आवाजात गाणी लावून शांततेचा भंग करणाऱ्या दोन पबवर परीमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी छापा टाकत शनिवारी (दि. 27) मध्यरात्री कारवाई केली. या दोन्ही ठिकाणी तरुण- तरुणीने मोठी गर्दी केली होती. तसेच फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडवून डान्स सुरू असल्याचे दिसून आले.

या प्रकरणी पाब्लो लाउंज आणि बॅरलच्या चालकावर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही ठिकाणी सॅटर्डे नाइट पार्टीच्या नावाखाली धांगडधिंगा सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शाहू यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दोन्ही ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्याठिकाणी त्यांना मर्यादेपेक्षा जास्त गर्दी आढळून आली आणि दोन्ही ठिकाणी वेळेचे भान न ठेवता विविध खाद्यपदार्थ आणि पेय उपलब्ध करून दिले जात होते. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाब्लो लाउंज आहे तर बॅरल अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते.

कोरोना संसर्गाचा धोका असताना पाब्लो आणि बॅरलच्या संचालकांनी सॅटर्डे नाइट पार्टीचे आयोजन केले होते. खाओ, पीओ, मजा करो असे या पार्टीचे स्वरूप असल्याने मोठ्या प्रमाणात तेथे तरुणांनी गर्दी केली होती. डांसच्या नावाखाली धांगडधिंगा सुरू होता. सोशल आणि फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडवून डान्स सुरू होता. शिवाय संचालकांना ठरवून दिलेली वेळ संपूनही दोन्ही ठिकाणी पार्टी सुरू होती. या प्रकरणी पाबलो आणि बॅरलच्या संचालकांविरुद्ध मध्यरात्री कारवाई करण्यात आली आहे.

You might also like