Dearness Allowance | मूळ पगारावर किती मिळेल DA? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Central Government Employees) लवकरच महागाई भत्ता (Dearness Allowance ) वाढवला जाणार आहे. मार्चमध्ये होळीच्या (Holi) आसपास केंद्र सरकार (Central Government) आपल्या कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ होणार हे नक्की आहे. कोरोनामुळे (Corona) दीड वर्षापासून महागाई भत्ता बंद झाल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता त्यांचा महागाई भत्ता वाढत आहे. मागील वर्षी सरकारने महागाई भत्त्यात एकाच वेळी 11 टक्के वाढ केली होती.

 

दीड वर्षाच्या कालावधीत ही 11 टक्के स्थिर वाढ होती. मात्र, या मध्यांतराच्या थकबाकीबाबत सरकारने कोणतीही सूचना जारी केलेली नाही. पण, आता सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आणि सेवानिवृत्त (Retired) यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून केली जाणार आहे.

 

मार्चमध्ये घोषणा होईल
केंद्र सरकार दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै असे दोनदा महागाई भत्ता आणि महागाई मदत सुधारित करते. साधारणपणे मार्च आणि सप्टेंबर महिन्यात याची घोषणा केली जाते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. 1 जुलै 2011 पासून सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पेन्शनवर 31 टक्के डीए मिळत आहे.

डीए 3 टक्के वाढेल
यंदाही मार्च महिन्यात होळीच्या आसपास केंद्र सरकार महागाई भत्त्यात सुधारणा करणार आहे. नव्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे की, डीए 3 टक्क्यांनी वाढेल. AICPI निर्देशांकाचा नवीन डेटा जाहीर झाल्यानंतर, DA मध्ये वाढ होणे निश्चित आहे. मात्र अद्याप त्याची घोषणा झालेली नाही.

 

DA 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल
केंद्र सरकार केव्हाही वाढीव महागाई भत्ता जाहीर करेल तेव्हा तो 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल असे मानले जाते. म्हणजे जेवढे महिने निघून जातात तितके महिने कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनाही महागाई भत्त्याची थकबाकीचा (Outstanding) फायदा होईल. सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 48 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फायदा होईल. तसेच 69 लाख सेवानिवृत्त धारकांना याचा लाभ मिळेल.

 

अशी करा मूळ पगारावर गणना
तज्ज्ञांच्या मते, महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे की DA मध्ये 3 टक्के वाढ होईल.
म्हणजे ही वाढ होऊन DA 34 टक्के होईल. 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) आधारावर DA ची गणना मूळ पगारावर केली जाते.
जर तुमचा किमान मुळ पगार 18 हजार असेल तर DA मध्ये 540 रुपये वाढ होईल.

किती बेसिकवर किती DA वाढणार ?
जर तुमची बेसिक सॅलरी (Basic Salary) 25 हजार रुपये असेल तर प्रत्येक महिना DA मध्ये 750 रुपयांचा फायदा होईल.
50 हजार मूळ वेतन असेल तर 1500 रुपये वाढ होईल.
ज्यांचे मूळ वेतन 1 लाख आहे त्यांच्या पगारात 3 हजार रुपये वाढ होईल.
कॅबिनेट सचिव (Cabinet Secretary) स्तरावरील मूळ वेतन हे अडीच लाख रुपये आहे. अशा वेळी त्यांचा DA 7500 रुपयांनी वाढेल.

 

Web Title :- Dearness Allowance | dearness allowance calculation central employees can get da hike before holi in march 2022 under 7th pay commission employees salary

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा