आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विदयार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू

लोणीकंद: पोलीसनामा ऑनलाईन

वाघोली येथील रायसोनी कॉलेजच्या इमारतीवरून (शनिवारी) उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रश्मी प्रभू करनेवाड या विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार सुरु होते.

रश्मी करनेवाड ही रायसोनी कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. तिने शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान महाविद्यालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये तिचे दोन्ही पाय फ्रॅक्चर आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उडी मारल्यानंतर तिला कॉलेज प्रशासनाकडून उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल केले होते. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने सायंकाळी ८ नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रश्मीच्या जाण्याने कुटुंबावर व महाविद्यालयावर शोककळा पसरली आहे.