Death in Custody : पोलिस निरीक्षकासह तिघांना अटक तर PSI फरार

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – गोंदियामध्ये आमगाव पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीच्या मृत्यू Death प्रकरणात पोलीस निरीक्षकासह 3 पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तर एक पोलीस उपनिरीक्षक अटकेच्या भीतीने फरार आहे. पोलिसांवर खूनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कुंभारटोली येथील अनेक गुन्ह्यातील आरोपी राजकुमार अभयकुमार धोती याला अटक करण्यात आली होती. आमगाव कोठडीत पोलिसांनी राजकुमारला बेदम मारहाण केली होती. यामुळे त्याचा पोलीस कोठीत मृत्यू Death झाला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू Death झाल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले होते.

या प्रकरणात आरोपी पोलीस निरीक्षक सुभाष चौहान, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तात्रय कांबळे यांच्या विरोधात भादवी कलम 302,330,34 अंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे. यात पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव पसार असून त्याला अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी