डॉक्टर युवतीचा गळ्यात मांजा अडकून गळा चिरल्याने दुर्दैवी मृत्यू

पुणे /पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

अॅक्टिवा गाडीने नाशिक फाटा उड्डापुलावरून (पुणे) ते भोसरी येत असताना गळ्यात मांजा अडकून गळा चिरला गेल्याने डॉक्टर कृपाली निकम (वय २६, राहणार – पिंपळे सौदागर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली आहे. या बाबत भोसरी पोलीस अधिक माहिती घेत आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b64ede98-ca4b-11e8-9d4f-8986cc7d116a’]

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डॉक्टर कृपाली या आज उड्डाणपुलावरून भोसरीकडे अॅक्टिवा गाडीनेजात होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यात मांजा अडकून त्यांचा गळा चिरला गेला. त्यामध्ये त्या मयत झाल्याची माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी पुणे शहरात देखील अशीच घटना घडली होती. एका मोठ्या दैनिकात मार्केटिंग विभागात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधीचा मांजा मुळे मृत्यू झाला होता.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb0a1c3b-ca4b-11e8-a6ce-0719e3bc654e’]

डॉक्टर कृपाली निकम या पिंपळे सौदागर परिसरात रहावयास होत्या. त्यांच्या बाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले या प्रकरणाची अधिक माहिती घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे डॉक्टर कृपाली निकम यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनेची माहिती मागविली आहे. मांजा मुळेच गळा चिरला जाऊन डॉक्टर कृपाली यांचा मृत्यू झाल्याने मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यात अशा प्रकारची घटना घडली त्यावेळी मांजा वर बंदी आणण्यात आली होती. मांजा ची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे तसेच खटले दाखल करण्यात आले होते. पोलिसांच्या कारवाई नंतर काही दिवस मांजा विकण्यास कोणी धजावत नव्हते आता मात्र मांजा ची खुले आम विक्री चालू असल्याचे आज घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे. घडलेल्या या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी तसेच काही उपनगरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

३ महिन्याच्या नातीचा आजीकडून गळा दाबुन खून 
लोणी काळभोर : डेंगी रोगावर उपचार घेणाऱ्याचा मृतदेह रेल्वे ट्रेकवर आढळल्याने खळबळ
पुणे / पानशेत : नदीत बुडालेल्या आईला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या बहिण-भावाचा मृत्यू