आधारलिंकचा बळी :  रेशनचे धान्य न मिळाल्याने भुकेने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

बुलडाणा :  पोलीसनामा ऑनलाईन 

केवळ आधार कार्ड लिंक केले नसल्याने रेशनवरील धान्य न मिळाल्याने एका वृद्धाचा भूकेने मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. दोन महिन्यापासून हा ६५ वर्षीय वृद्ध रेशनच्या धान्यापासून वंचित होता. त्यामुळे उपाशी पोटी त्यांचा मृत्यू झाला. डिजिटल इंडियाचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्रात रेशनवरील धान्य मिळाले नाही म्हणून वृद्धाचा मृत्यू झाला आहे. आम्ही लाभार्थीच्या जाहिराती कशा दिशाभूल करणाऱ्या आहेत हेच या प्रकरणावरून दिसून येत आहे. शिवाय, आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी शासन किती टोकाची भूमिका घेत आहे, हे देखील या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a0014d7f-c3a5-11e8-b58a-c908b9c601be’]

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात ही संतापजनक घटना घडली आहे. यासंदर्भात मृत वृद्धाच्या पत्नीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. माझ्या पतीचा भुकेपोटी मृत्यू झाल्याचे निवेदन वृद्ध पत्नीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. यामुळे सरकारची ऑनलाइन प्रक्रिया किती जाचक ठरत आहे ते पुन्हा एकदा उघड झाले आहे. दरम्यान या घटनेनंतर बुलडाणासह राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

तारीक अन्वर यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम यांचा राजीनामा

मोताळा तालुक्यातील जयपूर येथे गोविंद गवई व पंचफुला गवई हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्य करते. त्यांना अपत्यही नाही. हातपाय थकल्याने त्यांचा उदरनिर्वाह कसाबसा चालत होता. अंतोदय दारिद्र्य रेषेखाली हे कुटूंब येत असल्याने रेशन दुकानातून धान्य मिळत होते. मात्र शासनाच्या निर्देशानुसार रेशन कार्डला आधारसोबत लिंक करणे आवश्यक होते. गवई कुटुंबानी रेशन कार्ड लिंक न केल्याने रेशन दुकानदाराने दोन महिन्यापासून या दाम्पत्याला धान्यच दिले नाही. गोविंद गवई यांनी तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात चकराही मारून अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र राशन कार्ड लिंक झाले नाही. शेवटी उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. फक्त पाणी पिऊन ते दिवस काढत होते. अखेर २१ तारखेला गोविंद गवई या ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
[amazon_link asins=’B00DRLAY3C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4097a981-c3b8-11e8-aa9f-4bcf332ff9aa’]

उद्योजकाच्या आत्महत्येप्रकरणीचा गुन्हा रद्द करण्याचा न्यायालयाचा आदेश

माझ्या पतीचा भुकेपोटी मृत्यू झाला आहे. अशा प्रकारचे निवेदन वृद्ध पत्नी पंचफुला गवई यांनी जिल्हाधिकरी यांना दिले आहे. या संतापजनक घटनेनंतर काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मोताळा तहसीलमध्ये ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच पीडित पंचफुला यांचे फोन वर जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्याशी बोलणे करुन दिले. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे यांच्याशी चर्चा केली. नंतर पीडित पंचफुला यांना तत्काळ संजय गांधी निराधार योजनेत सामिल करण्यात आले. मुलबाळ नसलेल्या वृद्ध दाम्पत्याला रेशन दुकानातून फक्त आधारलिंक नसल्यामुळे राशनचे धान्य दिले न गेल्याने वृद्धाला जीव गमवावा लागला आहे. सबका साथ, सबका विकास म्हणत राज्य करणाऱ्या सरकारने जाहिरातीमधून बाहेर येऊन सत्यपरिस्थिती पहावी, अशी प्रतिक्रिया येथील संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या चूकीच्या धोरणामुळे भूकेने एका वृद्धाचा बळी गेल्याने बुलडाणा जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राज्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, ठोकून काढू : राजू शेट्टी

[amazon_link asins=’B07BMT1VSS,B01GRI6Q3I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c57ca333-c3a5-11e8-939b-1ba7132f009d’]

पुणे : होंर्डिंगच्या बेकायदा परवाना फी वसुलीला 4 वर्षांनी घेतली मंजुरी