‘जय जवान जय किसान’ संघटनेचे शरद खेडीकर यांचा आंदोलनात उभे असताना मृत्यू

नागपूर: पोलिसनामा ऑनलाइन

‘जय जवान जय किसान’ संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचा शेतकरी आंंदोलनात उभे असताना हृदयविकाराने मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आज (सोमवार) सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते नागपूर येथील प्रजापतीनगरमध्ये शेतकरी आदोलनासाठी रस्त्यावर उभे होते. या आदोलनात दूध रस्त्यावर ओतण्यावरुन खेडीकर आणि पोलीस यांच्यामध्ये बाजाबाची झाली होती. आंदोलनात उभे असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना जवळील रुग्णालयात नेले. मात्र, डाॅक्टरांनी खेडीकर यांना मृत घोषित केले.

आंदोलनात उभे असताना खेडीकर यांना उन आणि धावपळ याचा त्रास झाल्यामुळे ही घटना घडली असावी अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु आहे. मात्र, वैद्यकीय अहवालानंतरच सर्व स्पष्ट होईल.