कामाची गोष्ट ! तुमचं ‘डेबिट’, ‘क्रेडिट’ कार्ड 16 मार्च नंतर होईल ‘ब्लॉक’ जर तुम्ही हे नाही केलं तर, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – बँकिंग फ्रॉडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे. म्हणूनच आरबीआयने डेबीड आणि क्रेडिट कार्डच्या सुरक्षेसाठी नवीन सुविधा आणण्याचा निश्चय केला आहे. 16 मार्च 2020 बँके कडून दिल्या जाणाऱ्या सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड ATM च्या माध्यमातून डोमेस्टिक ट्रांजक्शन आणि प्वाइंट ऑफ सेल (PoS) साठी इनबिल्ड असणार आहे. जर कार्ड होल्डर याचा वापर ऑनलाइन व्यवहारासाठी करू पाहत असेल तर त्यांना आपल्या बँकेशी संपर्क करावा लागेल. आरबीआयने या कार्डच्या सुरक्षेसाठी अनेक नवीन नियम आणले आहेत. ते पुढीलप्रमाणे

1.16 मार्चनंतर नवीन आणि पुन्हा जारी केलेली कार्डे केवळ एटीएम आणि पॉईंट ऑफ सेलवर काम करू शकतील. आरबीआयने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की ही सर्व कार्डे केवळ कॉन्टॅक्स आधारित वापरासाठी असतील.

2.जर एखादा कार्ड होल्डर आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाइन,इंटरनॅशनल किंवा अन्य व्यवहारासाठी करू इच्छित असेल तर त्यांना आपल्या बँकेशी संपर्क करावा लागेल.

3.जर एखाद्या ग्राहकाला कार्डचा वापर भारताबाहेर करू इच्छित असेल तर यासाठी देखील त्यांना बँकेशी संपर्क करून ही सुवीधा सुरु करून घ्यावी लागेल. सध्या बँकेने सुरु केलेली अनेक कार्डे ही जगातील कोणत्याही कोपऱ्यात चालणारी होती.

4.जर बँकेला वाटले की, तुमच्या कार्डला कसला धोका आहे तर ते कार्ड डिऍक्टिव्हेट करण्याचा बँकेला अधिकार असणार आहे.

5. आपण कोणत्याही ऑनलाइन, आंतरराष्ट्रीय किंवा संपर्कविरहित व्यवहारासाठी कार्ड वापरलेले नसल्यास, कार्ड बंद करण्याचा पर्याय बँकेकडे असेल.

6. कार्ड धारकास त्याच्या कार्डावर आढळणारी कोणतीही सुविधा चालू किंवा बंद करण्याचा पर्याय असेल. यात एटीएम व्यवहार, ऑनलाईन व्यवहारांचाही समावेश असेल.

7. आरबीआयने सांगितल्याप्रमाणे कार्डधारकांना त्यांच्या कार्डाची मर्यादा ठरविण्याचा पर्यायदेखील असेल. म्हणजेच व्यवहार करताना तुम्ही कार्डवर लिमिट ठेवू शकता की जास्तीतजास्त एवढ्या रकमेचाच व्यवहार होणार.

8.केंद्रीय बँकेने सर्व बँकांना आपल्या ग्राहकांना 24×7 मोबाइल अ‍ॅप्स देण्यास सांगितले आहे, ज्यात नेटबँकिंगचा पर्याय आहे आणि ते त्यांच्या कार्डाची मर्यादा स्वत: सेट करू शकतात तसेच सुविधा सुरू करू किंवा थांबवू शकतात. ही सुविधा बँक शाखा आणि एटीएमवरही उपलब्ध असेल.

9.कार्ड संबंधातील हे नियम प्रीपेड गिफ्ट आणि मांस ट्रांजिट सिस्टमसाठी देखील लागू होईल.

10.डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डबाबत हे नवीन नियम 16 मार्च 2020 पासून लागू केले जातील.

फेसबुक पेज लाईक करा –