पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Debu Rajan Khan Suicide | प्रसिद्ध लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू राजन खान (वय-28) याने सोमाटणे फाटा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी (दि.2) दुपारी सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती परिसरात असणाऱ्या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये ही घटना घडली आहे. तो आयटी अभियंता होता. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामधून त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. (Debu Rajan Khan Suicide)
डेबू खान हा घरी एकटा राहत असल्याची माहिती मिळत आहे. त्याने सोमवारी दुपारच्या वेळेत पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या केली त्यावेळी तो घरामध्ये एकटाच होता. आत्मत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहीली आहे. आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे, असा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने केला आहे. (Debu Rajan Khan Suicide)
राजन खान यांचा मुलगा डेबू आयटी अभियंता होता. तो सोमाटणे फाटा येथे एकटाच राहात होता.
मात्र, सोमवारी सकाळपासून त्याने घराचे दार उघडलेच नाही. हे पाहून दुपारी घर मालकिणीने डेबूच्या भावाशी संपर्क साधला. भावाने ही डेबूशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. पुण्यात राहणाऱ्या भावाने सोमाटणे फाटा येथे येऊन घराचे दार ठोठावले. मात्र डेबूने घराचे दार उघडले नाही. अखेर याबाबत तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घराचा दरवाजा तोडला. घरात प्रवेश केला असता, बेडरूममधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचे समोर आले.
आत्महत्येपूर्वी डेबू ने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यात आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केल्याचं
अन् त्यातून फटका बसल्याचा उल्लेख आहे. तसेच ज्यांच्याशी पैशांची देवाण-घेवाण केली, त्यांची नाव ही नमूद केली आहेत.
आता त्याच आधारावर पोलीस तपास करीत आहेत. डेबूचं शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या वॉर्ड नं. 16 मधून आरोपीचे पलायन, प्रचंड खळबळ
03 October Rashifal : मिथुन, वृश्चिक आणि मकर राशीच्या जातकांना होणार धनलाभ, वाचा दैनिक भविष्य