Raj Thackeray | ‘तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर, नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारवर टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray | नांदेड येथील शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने, खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावरून आता राजकीय नेत्यांकडून सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सरकारवर (State Government) निशाणा साधला आहे. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असल्याचा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटर अकाउंटवर पोस्ट करुन सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे म्हणाले, नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय.

https://x.com/RajThackeray/status/1709046795030986798?s=20

आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ?

दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे.
सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक
लक्ष द्यावं, असे राज ठाकरे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून नाना पेठेत भरदिवसा दोघांवर खुनी हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक, प्रचंड खळबळ

Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या वॉर्ड नं. 16 मधून आरोपीचे पलायन, प्रचंड खळबळ

03 October Rashifal : मिथुन, वृश्चिक आणि मकर राशीच्या जातकांना होणार धनलाभ, वाचा दैनिक भविष्य