Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून नाना पेठेत भरदिवसा दोघांवर खुनी हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून भरदिवसा नाना पेठेत (Nana Peth Pune) दोघांवर टोळक्याने हातोडा आणि कुर्‍हाडीने खुनी हल्ला (Attempt To Murder) केल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून दुसरा देखील गंभीर जखमी आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, 5 जण स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समजत आहे. (Pune Crime News)

अनिकेत ज्ञानेश्वर दूधभाते (30, रा. आंबेगाव पठार, पुणे) आणि निखिल सखाराम आखाडे (27, रा. धनकवडी, पुणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. (Pune Crime News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुमारे दीड महिन्यापुर्वी अनिकेत दुधभाते याला तुषार वाडेकरने बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर आज दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास समर्थ पोलिस ठाण्याच्या (Samarth Police Station) हद्दीत नाना पेठेत संशयित आरोपी रामजी गुजर, आयुष बिडकर, पैलवान आणि यश (पुर्ण नावे अद्याप समोर आलेली नाहीत) यांनी हातोडा आणि कुर्‍हाडीने दुधभाते आणि आखाडे यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. आखाडे याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुधभाते याच्याविरूध्द सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) भादंवि 324 प्रमाणे गुन्हा दाखल
असून आखाडे याच्याविरूध्द दोन गंभीर गुन्हे सहकारनगर पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
त्याच्यावर सहकारनगर पोलिसांनी 2 वर्षासाठी तडीपारीची (Pune Police Tadipari Action) कारवाई केली होती.
मात्र, तो अपीलात गेल्यामुळे त्याची तडीपारी जानेवारी 2023 मध्ये रद्द करण्यात आली आहे.
सदरील खुनी हल्ला हा पुर्ववैमनस्यातून झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 5 जण स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती उच्च पदस्थ अधिकार्‍याने दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोंढवा: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना