December Arthik Rashifal 2020 : 4 राशींसाठी ‘लकी डिसेंबर’, जाणून घ्या कोणाला होणार ‘धनलाभ’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना आला आहे. अनेक राशींसाठी हा महिना खुप विशेष आहे. ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कर्क, सिंह, मकर आणि मीन राशीचे लोक आर्थिक बाबतीत मजबूत राहतील. तर, काही राशीच्या लोकांचा खर्च या महिन्यात खुपच जास्त वाढण्याची शक्यता आहे.

मेष –
आर्थिक प्रकरणांत यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. नव्या जॉबमध्ये चांगली सॅलरी मिळू शकते. खर्चाबाबत बोलायचे तर आवश्यक कामांवर पैसे खर्च होतील. एखादा खास नातेवईक किंवा मित्राच्या लग्नात खर्च होईल. मात्र, या महिन्यात उत्पन्न चांगले राहणार आहे.

वृषभ –
या महिन्यात मनासारखी बचत करता येणार नाही. आवश्यक गोष्टींवर पैसे खर्च करावे लागतील. जवळच मित्र आर्थिक मदत मागू शकतो. जोडीदराचा जॉब चांगला चालत राहील. याशिवाय मुलांच्या शिक्षणावर या महिन्यात जास्त खर्च करावा लागू शकतो.

मिथुन –
आर्थिक दृष्टीने हा महिना खुप चांगला नाही. उत्पन्न कमी होऊ शकते. पैशांची साधने सुद्धा कमी होऊ शकतात. घरातील एखाद्या कार्यक्रमात पैसे जास्त खर्च होतील. नातेवाईक तुमच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करू शकतात. या महिन्यात तुमचे एखादे किमती साहित्या हरवण्याची शक्यता आहे. यासाठी वस्तूंवर लक्ष ठेवा.

कर्क –
आर्थिक बाबतीत जास्त चिंता करण्याची गरज नाही, कारण या महिन्यात ग्रह नक्षत्र पूर्ण साथ देतील. आर्थिक बाजू मजबूत झाल्याने काही गुंतवणूक सुद्धा करू शकता. व्यापरात इच्छेप्रमाणे फळ मिळेल. अडकलेला पैसा परत मिळेल. बिझनेस वाल्यांनी काही नवीन सुरू करण्याचाही विचार केला पाहिजे, कारण या प्रयत्नात यशस्वी होण्याची पूर्ण शक्यता आहे.

सिंह –
या महिन्यात आर्थिक बाबतीत चांगले करण्यात यशस्वी व्हाल. पैशांची बचत होईल. दैनिक खर्चासाठी जोडीदाराचे सहकार्य लाभेल. रेग्युलर उत्पन्नाशिवाय सुद्धा तुम्हाला उत्पन्न प्राप्त होईल. खर्च मर्यादित राहतील. आर्थिक बाजूबाबत समाधानी राहाल. या महिन्यात मित्र किंवा नातेवाईकाला मदत कराल.

कन्या –
आर्थिक बाबतीत या महिन्यात काही चिंता असू शकतात. बहिण-भावाशी आर्थिक बाबतीत वाद होऊ शकतो. आर्थिक समस्यांबाबत सासरच्या लोकांशी चर्चा करू शकता आणि त्यांच्याकडे मदत मागू शकता. जोडीदाराच्या जॉबमध्ये सुद्धा अडचणी असू शकतात.

तुळ –
या महिन्यात तुळ राशीच्या जातकांची आर्थिक बाजू मजबूत सामान्य राहील. आर्थिक संकटात बिझनेस पार्टनर आर्थिक मदत करेल. जास्त किंमतीत प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग आहेत. हा तुमच्यासाठी नुकसानीचा सौदा असू शकतो. या महिन्यात पैशांची बचत शक्य आहे. मात्र, ही बचत पुरेशी नाही. महिन्याच्या अखेरीस पैसा जास्त खर्च होईल.

वृश्चिक –
आर्थिक जीवनात थोडी सावधगिरी बाळगावी आवश्यक आहे. अनावश्यक खर्च स्थिती बिघडवू शकतात. आरोग्यावर सुद्धा जास्त खर्च करावा लागू शकतो. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर अगोदर माहितगार व्यक्तींचा सल्ला घ्या. आई-वडिलांद्वारे देण्यात आलेली एखादी रक्कम या काळात त्यांना परत मिळू शकते.

धनु –
आर्थिक दृष्टीने पाहिल्यास महिना अपेक्षेप्रमाणे नाही. पैशाची अडचण अगोदरप्रमाणेच राहील. मात्र, संततीला शाळेतून स्कॉलरशिप मिळू शकते. या महिन्यात लोनसाठी अर्ज केला तर पुढील वर्षी जुलैपर्यंत पास होऊ शकते. अचानक आरोग्य खराब झाल्याने बजेट बिघडू शकते.

मकर –
आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी खुप प्रयत्न केले आहेत आणि या प्रयत्नांमुळे या महिन्यात खुप पैसा मिळू शकतो. मात्र, खर्चात सुद्धा वाढ होईल. जोडीदाराच्या एखाद्या नवीन जॉबमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. या महिन्यात गुंतवलेल्या पैशांचा सुद्धा लाभ मिळू शकतो. तुमच्याकडे पैशांचे अनेक स्त्रोत असतील, यासाठी जास्तीत जास्ती बचत करा.

कुंभ –
बहिण-भावाकडून आर्थिक मदत मिळण्याची आशा आहे. नवीन घरात शिफ्ट होण्याचा विचार करत असाल तर पैसा जास्त खर्च होईल. गुंतवणूक किंवा उधार पैसे दिल्याने नुकसान होऊ शकते. कोणत्याही क्षेत्रात पैसे गुंतवताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. या महिन्यात वाहन सुद्धा खरेदी करू शकता.

मीन –
या महिन्यात बचत करण्यात सक्षम असाल. मागील काळात गुंतवणूक केली असेल तर त्यामध्ये लाभ मिळण्याची पूर्ण आशा आहे. जर एखाद्या सरकारी खात्यात पैसे अडकलेले असतील तर परत मिळू शकतात. स्वताचे काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते.

You might also like