विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. संस्थेच्या 33 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या उद्देशाने मायक्रोसॉफ्टची लायसेन्स कॉपी खरेदी करण्यात येणार आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इतिहासातील महत्त्वाचा निर्णयाची महिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाहक प्रा. धनंजय कुलकर्णी, स्थानिक व्यवस्थापन समिती अ‍ॅड. नीतीन आपटे, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य रोहिणी होनप इत्यादी उपस्थित होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी पत्रकार परिषद महत्त्वाचे मुद्दे
– डीईएस नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात दि. २१ मे पासून प्रथम वर्ष वगळता अन्य सर्व वर्गांचे ऑनलाइन लेक्‍चरला प्रारंभ
– सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार
– एक तास, एक शिक्षक, एक विषय, एका वेळेला २५० विद्यार्थी अशी रोज ४ ते ५ लेक्‍चर
– विधी महाविद्यलयातील विद्याथर्यांचे अभ्यासक्रम पूर्ण होण्यास मदत शिवाय अभ्यासासाठी अधिकचा वेळ
– टयूटोरियल आणि नोटस देणार
– शिक्षकांचे मोठे योगदान
– डीईएसची पूर्व प्राथमिक ते महाविद्यालयातील शिक्षण ऑनलाइन देण्याची योजना
– सुट्टीमध्ये पूर्व प्राथमिकसाठी चित्रकला आणि हस्तकला ऑनलाइन
– प्राथमिकसाठी खेळाद्वारे अभ्यास ऑनलाइन
– माध्यमिक शाळांना सुविधा देणार
– इयत्ता दहावीसाठी ऑनलाइन वर्ग सुरू
– इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कला आणि वाणिज्य शाखा फर्ग्युसन महाविद्यालयात ऑनलाइन वर्ग सुरू
– प्रथम वर्ष वगळता वरिष्ठ महाविद्यालयाचे ऑनलाइन वर्ग १ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन
– विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य
– सुट्टीत संगीत, शारीरिक शिक्षण, योगाचे ऑनलाइन वर्ग
– कोरोना जनजागृती ऑनलाइन अभियान राबविले
– पाककृती संदर्भात ऑनलाइन मार्गदर्शन
– बुद्धीला चालना देणारे उपक्रम
– उद्योग, आरोग्य, सामाजिक कार्य या विषयात संशोधन कार्य पूर्ण
– बी व्होक अभ्यासक्रमाअंतर्गत कोरोनात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांचा कार्य अहवालावर प्रकाश टाकणारे प्रकल्प
– ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची अधिक उपस्थिती
– ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न
– सर्व लेक्‍चरचे रेकॉर्डिंग करून ठेवणार
– विद्यार्थ्यांना अभ्यास आणि संदर्भासाठी उपयुक्त ठरेल
– पहिल्या टप्प्यात शास्त्र, वाणिज्य, विज्ञान शाखांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम त्यानंतर नर्सिंग व फिजिओथेरपी शेवटच्या टप्प्यात व्यवस्थापन
– विद्यापीठाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शैक्षणिक वर्ष आणि प्रवेश आदी प्रकिया पार पाडणार
– शिक्षकांना प्रशिक्षण देण्यावर सध्या अधिक भर
– विविध क्षेत्रातील प्रश्नांचा अभ्यास सुरू
– कायद्यांच्या उपयुक्ततेवर अभ्यास सुरू
– व्यावसायभिमुख अभ्यासक्रमांची रचना आणि प्रोत्साहन
– आयएमडीआरमध्ये कोविड संदर्भात दहा विविध विषयांवर संशोधन सादर
– डीईएस नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात २१ मे पासून ऑनलाइन अभ्यासक्रमाला सुरूवात
– बीएएलएलबी, बीबीएएलएलबी, एलएलबी आणि एलएलएमचे दुसऱ्या वर्षांपासूनचे वर्ग सुरू
– विद्यापीठ नियमांनुसार आणि सुचनांनुसार आगामी काळात पालन करणार
– मागील वर्षाचा उर्वरीत अभ्यासक्रम ऑनलाइन पूर्ण केला
– अभ्यास व्यतिरिक्त कला, सांस्कृतिक, नाटय आदी विषयक सुट्टीत ऑनलाइन उपक्रम
– विविध प्रकारचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे आयोजन सॉफ्टस्किल
– करिअर गायडेन्स वेबिनारचे आयोजन