ब्रिटिश न्यायालयाचा निकाल ! नीरव मोदीने कट रचला, भारताचे युक्तिवाद मान्य झाले, भारतात आणणार ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पंजाब नॅशनल बँकेच्या 14,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार हिरा व्यावसायिक नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या न्यायालयाने म्हटले की, नीरव मोदीविरोधात भारतात एक खटला चालू आहे, ज्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. या न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, नीरव मोदी यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचला आहे.

न्यायालयाने असेही म्हटले आहे की, नीरव मोदी यांना मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये योग्य वैद्यकीय उपचार आणि मानसिक आरोग्य सेवा देण्यात येईल. त्याच्या विरोधात प्रत्यार्पणाच्या आदेशाला नीरव यांनी न्यायालयात आव्हान दिले.

गुरुवारी, दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गूजी यांनी, नीरव यांच्याविरूद्ध कायदेशीर खटला चालविला आहे. ज्यात त्याला भारतीय न्यायालयात हजर राहावे, असा निर्णय दिला.

लंडन न्यायालयाच्या या आदेशामुळे नीरव मोदी यांना भारत आणण्याचा मार्ग जरी स्पष्ट दिसत असला तरी, त्यात अजूनही काही त्रुटी बाकी आहेत. कारण म्हणजे कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय नीरव मोदींकडे अजूनही आहे.

दोन वर्षांपूर्वी नीरव मोदी यांना ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी 13 मार्च 2019 रोजी लंडनमधून अटक केली होती, त्यानंतर ते दक्षिण पश्चिम लंडनच्या वँड्सवर्थ कारागृहात तुरूंगात आहेत. निकाल ऐकण्यासाठी नीरव मोदी वांड्सवर्थ जेलमधून व्हिडिओ लिंकद्वारे हजर झाले. आता कोर्टाचा निर्णय ब्रिटनच्या गृहसचिव प्रीती पटेल यांना पाठविला जाईल, जो या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्यास परवानगी द्यायचे की नाही?, याबाबत निर्णय घेतील.