2 दशकांपासून कमी होऊ लागले आहे का निरोगी माणसांच्या शरीराचे सरासरी तापमान

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था  – सुमारे दोनशे वर्षांपूर्वी जर्मन फिजिशियन कार्ल वुंडरलिच यांनी सांगितले होते की, माणसाच्या शरीराचे सरासरी तपामान 98.6 डिग्री फॅरनहाइट आहे. तेव्हापासून आतापर्यंत डॉक्टरांपासून मुलांच्या आई-वडिलापर्यंत सर्वजण हेच मानक मानून आजारी लोकांचा ताप मोजत आले आहेत की ताप किती तीव्र आहे. परंतु अलिकडच्या काही काळात निरोगी प्रौढ व्यक्तींमध्ये शरीराचे सरासरी तपामान कमी झाले आहे.

दोन वर्षांपासून दोन अभ्यास
2017 मध्ये यूकेमध्ये एका अभ्यासात 35 हजार प्रौढ व्यक्तींच्या शरीराचे सरासरी तापमान कमी आढळले, जे 97.9 डिग्री फॅरनहाइट आढळले. तर 2019 मध्ये करण्यात आलेल्या एक अन्य अभ्यासात अमेरिकेच्या पालो आल्टो आणि कॅलीफोर्नियाच्या लोकांमध्ये शरीराचे सरासरी तापमान 97.5 डिग्री फॅरनहाइट आढळले.

नवीन संशोधन
नुकतेच युसी सांता बारबाराचे मानवंश शास्त्राचे प्रोफेसर मायकल गूर्व्हन यांच्या नेतृत्वाखाली अंतरराष्ट्रीय फिजिशियन, मानववंश शास्त्रज्ञ आणि स्थानिक संशोधकांच्या टीमने अशाप्रकारच्या तापमानात कमतरता असल्याचे संकेत बोलिवियाच्या अमेजनमधील स्थानिक लोकसंख्येच्या लोकांमध्ये आढळले.

16 वर्षांपासून लोकांवर अभ्यास
सायने हेल्थ अँड लाइफ हिस्ट्री प्रोजेक्टचे सह संचालक गूर्व्हन आणि त्यांचे सहकारी संशोधक 16 वर्षांपासून या लोकसंख्येचा अभ्यास करत आहेत. त्यांना येथे सरासरी शारीरिक तापमानात वेगाने घसरण होत असल्याचे आढळून आले. हे तापमान 0.09 डिग्री फॅरनहाइट प्रतिवर्षाच्या दराने कमी होत आहे. अशाप्रकारे आज सायने लोकांमध्ये सरासरी शारीरिक तापमान 97.7 डिग्री फॅरनहाइट आहे.

गूर्व्हन यांचे म्हणणे आहे की, मागील दोन दशकापासून आम्ही एकाच दराची कमतरता पहात आहोत. जसे की, अमेरिकेत दोनशे वर्षापूर्वी दिसून आले होते. गूर्व्हन यांच्या टीमच्या विश्लेषणात 18 हजार नमूणे घेतले गेले होते. ज्यामध्ये 5,500 प्रौढ होते. या अभ्यासात आजूबाजूचे तापमान आणि शरीराच्या वजनासारखी कारके सुद्धा सहभागी करण्यात आली होती, जी शरीराच्या तापमानाला थेट प्रभावित करू शकतात.