Deepak Kesarkar | दीपक केसरकारांचे सूचक विधान, म्हणाले-‘उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना पुन्हा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Session) वेगवेगळ्या मुद्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केल्याने संघर्ष निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. याच दरम्यान उपसभापती यांच्या दालनासमोर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याची चर्चा आहे. यावर बोलताना मी आगामी एक किंवा दोन दिवसांत बोलेन असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण (Self-Examination) केले तर शिवसेना पुन्हा एकदा एकसंघ होण्यास वेळ लागणार नाही, असेही सूचक विधान केसरकर यांनी केले.

 

 

मी बोलेन तेव्हा…

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमदारांची मने जिंकली. त्यामुळेच आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यावेळी काय काय घटना घडल्या हे बोलून दाखवणार आहे. मी ते मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेले आहे. सध्या नवे वर्ष आहे म्हणून मी बोलत नाहीये. एक दोन दिवस जाऊदे. नंतर मी बोलतो. मी ज्यावेळी बोलेल तेव्हा महाराष्ट्रच नाही तर प्रत्येक शिवसैनिकांना समजेल, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

 

उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले तर…

ज्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांसाठी लढा लढवला ते सहजासहजी सोडून जात नाहीत.
निश्चितपणे काहीतरी घडलेलं आहे, ज्यामुळे आमदार बाहेर पडले.
नेमकं काय घडलं होते, याचे उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे.
उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना पुन्हा एकसंध होण्यास वेळ लागणार नसल्याचे सूचक विधान दीपक केसरकर यांनी केले.

 

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar and uddhav thackeray has to self introspect for shivsena reunion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा