Vidya Balan B’day | 2 वेळा घटस्फोटित सिध्दार्थ रॉय कपूरसोबत विद्या बालनची लव्हस्टोरी खूपच रंजक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vidya Balan B’day | अभिनेत्री विद्या बालनला बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज विद्या बालन 44 वर्षाची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही रुचकर गोष्टी. (Vidya Balan B’day)

 

विद्या बालनने 14 डिसेंबर 2012 रोजी चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ रॉय (Siddharth Roy Kapur) कपूरसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाले आहे. त्या संदर्भातली एक पोस्ट विद्या बालनने नुकतीच शेअर केली होती. विद्या बालन सिद्धार्थ रॉय कपूरची पहिली, दुसरी नाही तर चक्क तिसरी बायको आहे. सिद्धार्थचे याआधी दोन लग्न झाले होते. या दोन्ही लग्नाच्या घटस्फोटानंतर त्याने विद्या बालनशी लग्न केले होते. (Vidya Balan B’day)

 

सिद्धार्थचे पहिले लग्न त्याची बालपणीची मैत्रीण आरती बजाज हिच्यासोबत झाले होते. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर सिद्धार्थने टीव्ही प्रोडूसर कविता सोबत लग्न केले. हे लग्न देखील फार काळ टिकले नाही आणि त्यांनी 2011 मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर एका फिल्मफेअर अवॉर्डच्या बॅकस्टेजमध्ये विद्या बालन आणि सिद्धार्थ एकमेकांना भेटले होते.

या दोघांची भेट करण जोहरने करून दिली होती. सिद्धार्थ पहिल्यांदाच विद्याला पाहता प्रेमात पडला होता.
त्याकाळीदेखील विद्या एक यशस्वी अभिनेत्री होती.
त्यानंतर हळूहळू हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न बंधनात अडकले.

 

Web Title :- Vidya Balan B’day | happy birthday vidya balan know her love story
with husband siddharth roy kapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा