Prithviraj Chavan | मोदींनी निवडणूक आयोगासह इतर संस्थाही काबीज केल्यात, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आज घणाघती आरोप केले आहेत. ते सातारा काँग्रेस कमिटीने (Satara Congress Committee) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगासह (Election Commission) इतर संस्थांही काबीज केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय होत आहेत. यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणीही केली.

 

सातारा येथे आयोजित या बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकार्‍यांच्या या बैठकीत विविध ठराव घेण्यात आले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत देण्यात यावी, याचा ठराव झाला. त्याचबरोबर राज्यात कमी पटांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील 1,077 शाळा बंद होतील. त्यामुळे 11 हजार मुलांचे शिक्षण थांबणार आहे. याबाबतच निषेध ठराव घेण्यात आला.

 

 

यावेळी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 22 वर्षांनी झाली. ही निवडणूक पक्षाच्या घटनेनुसार होऊन मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षाला चांगले दिवस येतील. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही ‘भारत जोडो’ पदयात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात ही यात्रा येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करून लोकशाही टिकविण्याचे काम राहुल गांधी यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा करेल. त्याचबरोबर काँग्रेसमधून जे बाहेर गेलेत, त्यांना परत कसे आणता येईल, हेही पाहिले जाणार आहे.

ते पुढे म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का नाही, असा प्रश्न आहे.
कारण, पंतप्रधानांनाच अशा संस्थांच्या नेमणुकीचे अधिकार आहेत. राज्यातील सरकार तर तात्पुरती व्यवस्था आहे.
ईडीच्या तावडीतून सुटण्यासाठी हे डबल इंजिनचे सरकार आहे.
याचा फटका राज्याला बसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल.

 

काँग्रेसवर आपण नाराज होता, त्याचे काय झाले? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,
त्यावेळी आम्ही काँग्रेस अध्यक्षांना पत्र दिले होते. हे पत्र गोपनीय होते. तरीही त्याची माहिती बाहेर गेली.
त्यावेळी सोनिया गांधींनी सर्व बाबी मान्य केल्या. आता नाराज असण्याचे कारणच नाही.

 

Web Title :- Prithviraj Chavan | decisions by prime minister doing injustice to
maharashtra criticism of congress leader former chief minister prithviraj chavan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा