Aaditya Thackeray | नरेश म्हस्केंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं, म्हणाले-‘…म्हणून आदित्य ठाकरे ठाण्यात आले नाहीत’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – दिवाळी पहाटचे निमित्त साधून पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटाचे राजकारण रंगले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातर्फे ठाण्यात दिवाळी पहाटचे (Diwali Pahat) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात तरुणांनी हजेरी लावली. यावेळी ठाण्याचे माजी महापौर आणि शिंदे यांचे समर्थक नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना चिमटा काढला. आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही म्हणून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) ठाण्यात आले नाहीत, असे नरेश म्हस्के म्हणाले.

 

ठाण्यात शिंदेंच्या गटातर्फे अनेक ठिकाणी दिवाळी पहाट चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने देखील अनेक ठिकाणी दिवाळी पहाट ठेवली होती. या कार्यक्रमांना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) भेट देणार होते. पण आदित्य ठाकरेंनी ठाण्यात येण्याचे टाळले. ठाण्यातील राम मारुती मार्गावरील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. राम मारुती मार्गावरील कार्यक्रमास मोठी गर्दी उसळली होती. यावेळी तरुणाई देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. पण ठाण्यात आल्यानंतर आपल्याला येवढा प्रतिसाद मिळणार नाही, म्हणून आदित्य ठाकरेंनी ठाण्यात येण्याचे टाळले, असा टोला नरेश म्हस्केंनी ठाकरेंना लावला.

यावेळी नरेश म्हस्के पुढे म्हणाले, ठाण्यात सगळी गर्दी निष्ठावंतांची होती.
सगळे निष्ठावंत एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे होते.
ठाकरे गटातील लोक फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी हिंदुत्व हिंदुत्व करत असतात.
ठाकरेंच्या गटातील लोक स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणतात आणि परत हिंदूंना विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात.
त्यामुळे त्यांच्यासोबत जनता नाही.

 

 

Web Title :- Aaditya Thackeray | due to that fear aditya thackeray did not come to
thane say shinde group leader naresh mhaske

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा