MNS MLA Raju Patil | मनसे-भाजप-बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या प्रश्नावर राजू पाटीलांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे चिरंजिव आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. त्यावर आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची सर्वांची मने जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व जुळून येईल, असे राजू पाटील (MNS MLA Raju Patil) म्हणाले.

 

गेले अनेक दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची जवळीक वाढत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका (BMC) आणि विधानसभेत ठाकरेंच्या विरोधात महायुती होणार का? या प्रश्नांना उत आला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील मनसेच्या शिवाजी पार्कवरील दीपोत्सव (MNA Deepotsav) मेळाव्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. आता पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट चर्चेचे कारण बनले आहे.

 

राजू पाटील (MNS MLA Raju Patil) या आकस्मित भेटीबद्दल बोलताना म्हणाले, फडके मार्ग येथे सर्व संस्थांचे कार्यक्रम होत असतात. चांगल्या सणाच्या वेळी कोणी आडकाठी करत नाही.
तशी आपली संस्कृती देखील नाही. काल खासदार श्रीकांत शिंदे फडके मार्गावार एका कार्यक्रमाला आले होते.
मनसेच्या शहराध्यक्षांनी त्यांनी मनसे कार्यालयात येण्याची विनंती केली. आमच्या विनंतीला मान देऊन ते आले.
आम्ही राजकारणात जरी विरोधक असलो, तरी दुश्मन नक्कीच नाही. त्यामुळे आमच्या सर्वांची मने जुळलेली आहेत.
फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व काही जुळून येईल.

राजकारणात वैयक्तिक असे काही नसते. एकमेकाला चांगल्या शुभेच्छा आम्ही नेहमी देत असतो.
युतीबाबत सर्वस्वी निर्णय राज ठाकरेंचा आहे.
त्यांनी आम्हाला स्वतंत्र्य लढण्याचा आदेश दिला आहे. आम्ही त्याप्रमाणे तयारी करत आहोत.
त्यांनी आम्हाला म्हटले की, भविष्यात आपल्याला युतीसोबत जायचे आहे,
तर आम्ही त्याला देखील तयार आहोत, असेही राजू पाटील म्हणाले.

 

Web Title :- MNS MLA Raju Patil | dombivli mns raju patil reaction on
eknath shinde shrikant shinde visit mns office today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा