Pune Crime News | सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ लाईन बॉय विजय ढुमेचा बांधकामाच्या लोखंडी सळई व भरीव लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून खून, प्रचंड खळबळ

पुणे : Pune Crime News | सिंहगड रस्त्यावर अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. लाईन बॉय विजय ढुमे यांचा (Vijay Dhume) बांधकामाच्या लोखंडी सळई व भरीव लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून खून केला आहे (Murder In Sinhagad Raod Pune) . ही घटना सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Crime News)

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका अतिशय शांततेत पार पडल्यानंतर सायंकाळी सिंहगड रस्त्यावर ही खळबळजनक घटना घडली आहे. विजय ढुमे हे सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असून त्याचे अनेक बड्या पोलिस अधिकार्‍यांशी मैत्रीचे संबंध होते तसेच अनेक राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते. क्वॉलिटी लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला.

सिंहगड रोड पोलिस स्टेशन तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Line Boy Vijay Dhume Murder)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonavala Crime News | चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार, संशयित नराधमाची आत्महत्या

पुण्यातील सहकारनगरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, महिलांसह लहान मुले जखमी

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचं उल्लंघन, लक्ष्मी रोडवर 101.3 तर खंडूजीबाबा चौकात तब्बल 129 डेसिबल!

‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा