Maha Vikas Aghadi | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पदवीधर सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात (Swami Ramanand Tirtha Marathwada University) पदवीधर सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ज्ञानतीर्थ पॅनलने बाजी मारली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. 10 पैकी 9 जागांवर ज्ञानतीर्थ पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे ही छोटेखानी निवडणूक महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) जिंकल्याचे समाधान आहे.

 

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले (Dr. Uddhav Bhosle) यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या पदवीधर निवडणुकीत दहा जागांसाठी विविध पॅनलचे एकूण 41 उमेदवार उभे होते. महाविकास आघाडी पुरस्कृत ज्ञानतीर्थ पॅनल, एबीव्हीपीचा (ABVP) विद्यापीठ विकास मंच, विद्यापीठ महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी यांनी उमेदवार उभे केले होते.

 

या निवडणुकीचे मतदान 16 नोव्हेंबर रोजी झाले. त्यानंतर दि.17 नोव्हेंबर रोजी संपूर्ण निकाल हाती आले. यामध्ये खालील उमेदवार विजयी झाले आहेत.

खुला प्रवर्ग – नारायण चौधरी, विक्रम पतंगे , युवराज पाटील, विनोद माने
ओबिसी – महेश मगर, हनमंत कंधारकर
महिला – शितल सोनटक्के,
अनुसूचित जाती – बंटी अजय गायकवाड
अनुसूचित जमाती – बालाजी रेजीतवाड
भटक्या विमुक्त जाती जमाती – गजानन आसोलकर

 

Web Title :- Maha Vikas Aghadi | marathwada university graduate cinet election maha vikas aghadi won 9 out 10 seats

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shraddha Walkar Murder | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर; फाशीसाठी आवारात वकिलांचा राडा

Rahul Gandhi | ‘ते घाबरत नसते, तर त्यांनी कधीच या पत्रावर सही केली नसती’; राहुल गांधींची सावरकरांवर पुन्हा टीका

Chandrapur Murder Case | तीन महिन्याने बाहेर आला खुनाचा कट, मुलीने कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे आई अटकेत