पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी दिपक साकोरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील पोलीस दलातील विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश प्रलंबीत होते. बदली झालेले पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) पोलीस अधीक्षक दीपक साकोरे यांची पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश आज (मंगळवार) रात्री अपर पोलीस महासंचालक (अस्थापना) संदीप बिश्नोई यांनी काढले.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9288328a-aad7-11e8-98a1-ed371192ef4c’]

तसेच पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक शेषराव सुर्यवंशी यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) अधीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाचा आजच्या टॉप बातम्या