Deepali Sayed | दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाल्या – ‘…घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची आज पुण्यात जाहीर सभा (Raj Thackeray Pune Sabha) झाली. राज ठाकरेंची सभा होताच शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दिपाली सय्यद या मागील अनेक दिवसांपासून भाजप (BJP) आणि मनसे (MNS) यांच्यावर टीका करत असल्याचं पहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या (Azaan Loudspeakers) विरोधात भूमिका घतली. तसेच हे आंदोलन थांबलेलं नाहीये असंही त्यांनी आजच्या सभेत जाहीर केलं. याच मुद्यावरुन दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

 

दिपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हटलं, पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन (Agitation) करुन जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला. दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी केलेल्या या टीकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण काय प्रतिक्रिया येते हे पहावे लागेल.

काय म्हणाले राज ठाकरे ?
भोंग्यांचं आंदोलन हे एका दिवसाचं आंदोलन नाही. या गोष्टीला सतत्या नसेल, तर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरु होणार.
ते फक्त तुम्हाला तपासत असून तुम्ही हे विसरलात की हळूहळू आवाज वर यायला सुरु होणार. आता सुरु केलंय ना,
एकदाचा तुकडा पाडून टाका. मी एक पत्र तुम्हाला देणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की घराघरात ते पत्र पोहोचलं पाहिजे.
हे आंदोलन आहे. प्रत्येक वेळी ते रस्त्यावरच केलं पाहिजे असं नाही. पण त्याचं सहकार्य आवश्यक आहे.
तर गोष्टी बंद होतील, असं राज ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Deepali Sayed | shiv sena leader deepali sayed slams mns leader raj thackeray over his rally in pune ayodhya mosque loudspeakers amit thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan बाबत मोठी बातमी, वाढवण्यात आली ‘या’ कामाची अंतिम तारीख

 

Pune Minor Girl Rape Case | बहिणीच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 

Raj Thackeray Pune Sabha | राज ठाकरेंचा घणाघात, म्हणाले – ‘शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर…’ (व्हिडीओ)