Raj Thackeray Pune Sabha | राज ठाकरेंचा घणाघात, म्हणाले – ‘शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर…’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray Pune Sabha | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची आज पुण्यात जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना राज ठाकरे (Raj Thackeray Pune Sabha) म्हणाले, आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं.

 

औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचे अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी दर्शन घेतल्याच्या मुघ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले, आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची (MIM) औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघालेल्या त्या औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangzeb Tomb) डोकं टेकवतात. आणि आम्हाला लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असतील, तर यापलीकडे काय बोलायचं? अफजलखान छत्रपती शिवाजी महाराजांना (Shivaji Maharaj) मारायला आलाच नव्हता म्हणे. तो साम्राज्य विस्तारायला आला होता. मग छत्रपती शिवाजी महाराज काय त्याच्या रस्त्यात गेले का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. (Raj Thackeray Pune Sabha)

 

मनसेच्या पुण्यातील सभेला अंध विद्यार्थी आले होते, त्या विद्यार्थ्यांना त्यांना मंचावर बसवलं. आपल्या सभेला हॉल परवडत नाही,
पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी एस.पी. कॉलेज (S.P. College) मिळतंय का विचारलं होतं.
त्यानंतर त्यांनी देत नसल्याचं सांगितलं त्यामुळे आम्हाला नाही तर कुणालाच नाही.
नदी पात्रातील सभेचा विषय सुरु होता, पावसाची (Rain) शक्यता होती, काल मुंबईतही पाऊस सुरु होता.
सध्याचे पावसाळी हवामान (Rainy Weather) पाहता पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करायचं?
असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.तसेच निवडणूका आल्यावर पाहू असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Raj Thackeray Pune Sabha | mns raj thackeray slams ncp sharad pawar over aurangzeb comment in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यु; अल्पवयीन मुलासह दुचाकीमालकाविरोधात गुन्हा दाखल

 

Raj Thackeray Pune Speech | ‘निवडणूका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करायचं’ ! भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला (व्हिडिओ)

 

Vinati Organics Ltd | करोडपती बनविणारा शेअर ! 1 लाख रुपयांचे केले 15.86 कोटी रु, जाणून घ्या नाव