लग्नाच्या जेवणासाठी दीपिका आणि रणवीरने केला आचाऱ्यासोबत अनोखा करार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र केली जात असताना एक नवीन माहिती त्याच्या लग्नाच्या संदर्भात समोर अली आहे. त्यांच्या लग्नासाठी बारीक गोष्टींवरही मोठा खर्च करण्यात आला असून त्यांनी आचाऱ्यासोबत केलेला करार एकूण तर आपल्या सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसणार आहे. आपल्या लग्नात बनवलले पदार्थ इतर कोणत्याही लग्नात बनवायचे नाहीत असा करार लग्नाचा स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्यासोबत दीपिका आणि रणवीरने केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या लग्नात कोण कोणते पदार्थ बनवण्यात येणार आहेत याबद्दल माहिती नसली तरी त्यांच्या लग्नाच्या चर्चेने सातवे असमान गाठल्याचे बोलले जाते आहे.

रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाचा बार उद्या म्हणजे १४ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबर रोजी उडणार असून त्यांच्या लग्नाच्या ठिकाणी फक्त मोजक्या मंडळीला लग्नात आमंत्रित करण्यात आले आहे. रणवीर आणि दीपिका यांचे लग्न इटली येथील आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार असून त्यांच्या लग्नासाठी येणाऱ्या व्यक्तींना सोबत मोबाईल फोन घेऊन येण्यास बंदी घालण्यात आली असून आमंत्रित पाहुण्यांनी लग्नाचे फोटो प्रदर्शित करू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे बोलले जाते. परंतु दीपिका अथवा रणवीर यांच्या कडून याबद्दल अद्याप पुष्टी देण्यात आली नाही त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल झडत असलेल्या चर्चांबद्दल संभ्रमता असल्याचे दिसून येते आहे.

रणवीर आणि दीपिकाचे लग्न पार पडल्यानंतर त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन २८ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी पार पडणार आहे. या रिसेप्शन सोहळ्यासाठी बॉलिवूड मधील बड्या असामी उपस्थित राहणार आहेत ज्यांना इटली येथे लग्नाला उपस्थित राहता येणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणात येणार आहे. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची चर्चा पुढील काही दिवस अशीच चालू राहणार आहे . दीपिकाच्या आणि रणवीरच्या लग्न सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

दीपिका आणि रणवीर कपूर यांनी उतरवला आपल्या लग्नाचा विमा
दीपिका आणि रणवीर कपूर यांच्या लग्नासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असून त्यांच्या लग्नात कसलेही विग्न येऊ नये म्हणून त्यांनी एका विमा कंपनी कडून आपल्या लग्नासाठी विमा उतरवला आहे दिल्लीस्थित एका विमा कंपनीच्या माध्यमातून हे विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे . दीपिका रणवीर यांच्या कडून विम्याचे संरक्षण घेतल्याने बॉलिवूड जगतात मोठी चर्चा सुरु आहे.या कंपनीकडून भूकंप, चोरी, पूर,वादळ, आग अशा घटनासाठी विमा संरक्षण देण्यात आले आहे.