Deepika Padukone And Ranveer Singh | ‘खिडकीतून दगड पडला पण चुंबन थांबले नाही…’, रणवीर सिंहने सांगितला ‘तो’ किस्सा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग (Deepika Padukone And Ranveer Singh) हे दोघ आज बॉलिवूड चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने ‘राम लीला’ चित्रपटानंतर (‘Ram Leela’ Movie) ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’मध्ये एकत्र काम केले होते. विशेष म्हणजे जोडी म्हणून त्यांचे तिन्ही चित्रपट चांगले हिट आहेत. दरम्यान अशातच आपण ‘राम लीला’ शूटिंगवेळचा अशी एक गोष्ट जाणुन घेणार आहेत, जी एकुन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘राम लीला’ चित्रपटाची शुटिंग (Shooting Of ‘Ram Leela’ Movie) सुरु होती. दरम्यान या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग (Deepika Padukone And Ranveer Singh) हे दोघ महत्वाची भुमिका साकारत होते. महत्वाची बाब म्हणजे याचवेळी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या.

 

दरम्यान 13 नोव्हेंबर 2013 रोजी जेव्हा ‘राम लीला’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा रणवीर आणि दीपिकाची केमिस्ट्री (Ranveer and Deepika’s Chemistry) पाहून अनेक प्रेक्षकांचे डोळे उघडे राहिले. इतकच नाही तर या दोघांच्या रिअल लाइफ केमिस्ट्रीमुळे चित्रपटातील दृश्ये अधिक जिवंत झाली आहेत असे अनेक प्रेक्षकांचे मत आहे. ‘राम लीला’ चित्रपटाची शूटिंग झाली.तसेच चित्रपट रिलिझदेखील झाला , तरीसुध्दा दोघांपैकी कोणीही एकमेकांना डेटिंग किंवा रिलेशनशिपच्या (Dating Or Relationships)बातम्यांवर काहीही बोलले नव्हते. 2013 नंतर रणवीर आणि दीपिका पुढील 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मग काय, 14 नोव्हेंबर 2018 मध्ये दोघांनीही त्यांच्या नात्याचे लग्नात रुपांतर केले. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले की, रणवीरच्या प्रेमात पडणे ही तिच्यासाठी ‘पहिल्या नजरेतील प्रेम’ होते. 2012 मध्ये रणवीरला पहिल्यांदा भेटली होती. दरम्यान भेटताच रणवीरने तिला सांगितले की ‘मला वाटते की आपल्या दोघांचे नाते आहे.

खिडकीतून दगड पडला पण चुंबन थांबले नाही
एका मुलाखतीत रणवीरने एक किस्सा सांगितला होता. तो किस्सा म्हणजे दीपिकासोबतचा त्याचा अभिनय पाहून भन्साळीला वाटले की दोघेही प्रेमसंबंधात आहेत. पुढे बोलताना रणवीर म्हणाला की,शुटिंगदरम्यान दिग्दर्शकाने सीन कट केल्यानंतरही अभिनेत्याच्या मनात सीन संपत नाही. आणि ती भावना आतून चालू राहते. या संदर्भात आपला मुद्दा वाढवत त्याने ‘राम लीला’चा उल्लेख केला. रणवीर म्हणाला की, तो आणि दीपिका त्यांच्या किसिंग सीनमध्ये मी अशा प्रकारे हरवून गेले होते की खिडकीतुन दगडफेक करूनही ते वेगळे झाले नाहीत.

 

पुढे मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, ‘मला राम लीलामधील एक प्रसंग आठवतो, जेव्हा राम आणि लीला एकमेकांमध्ये हरवले जातात.
एका अतिशय उत्कट चुंबन दृश्यात आम्ही या बेडवर होतो. मी आणि दीपिका सेटवर परफॉर्म करत आहोत.
खिडकीतून खरी वीट फेकून काच-खिडकी तोडली जाते. पण पहिल्या टेकमध्ये दीपिका आणि मी चुंबन घेत होतो
आणि पूर्णपणे हरवलो होतो आणि वीट खिडकी तोडत आली होती.
तेव्हा भन्साळींना कळाले की (त्यांच्यात काहीतरी चालले आहे)…तेव्हा ते म्हणाले की हे बघ, नक्की!’ म्हणजेच,
भन्साळींना त्या किसिंग सीननंतर पुष्टी मिळाली की दीपिका आणि रणवीरचे अफेअर पुढे आले आहे.

 

Web Title :- Deepika Padukone And Ranveer Singh | ranveer singh deepika padukone kept kissing despite stone thrown from the window

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस गुंडानी केलेल्या कृत्याची आव्हाड माफी मागणार का? – किरीट सोमय्या

Nimrit Kaur Ahluwalia | बिग बॉस स्पर्धक निमृत कौर अहलुवालिया डिप्रेशनमध्ये, समोर आलं धक्कादायक कारण…

Pune Crime | दुचाकीस्वार आणि पीएमपी चालकाची फ्रि स्टाईल हाणामारी; पुणे स्टेशन परिसरातील घटना, व्हिडिओ व्हायरल