पोलीसनामा ऑनलाइन टीम | मोठ्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone Viral News ) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिच्या फॅशन सेन्सवर अनेक तरुणी फिदा आहेत. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे प्रेक्षकांच्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिनं एक फोटो पोस्ट केला आहे (Deepika Padukone Viral News).
दीपिका पादुकोननं (Deepika Padukone) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो (Deepika Padukone Instagram Photo) शेअर केला आहे. तिचा हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये तिनं लिहिलं की, ‘आपण 12 व्या वर्षी जे केलं, ते आता करू शकत नाही.. हा पहिला आणि शेवटचा प्रयत्न होता..(Deepika Padukone First Poem)’
दीपिकाने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी पहिल्यांदाच एक कविता लिहिली होती. नुकतंच तिनं ती कविता आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केली आहे (Deepika Padukone Viral News ). तसेच कविता शेअर करताना ती म्हणाली की, “कविता लिहिण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न होता. त्यावेळी मी 7 वी मध्ये होते आणि माझं वय 12 वर्ष होतं. कविता लिहिण्यासाठी फक्त दोन शब्द दिले मी… आणि मग तो इतिहास रचला.”
कवितेमध्ये दीपिकाने लिहिलं की, “मी एक प्रेमळ आणि काळजी घेणारी मुलगी आहे. मला आश्चर्य वाटतं की तारे किती दूर पोहोचतात. मला लाटांची गाज ऐकू येते. मी खोल निळा समुद्र पाहू शकते. मला प्रेमळ देवाचे मूल व्हायचे आहे. मी एक प्रेमळ आणि काळजी घेणारी मुलगी आहे. मी बहरलेले फूल असल्याचे भासवत आहे. देवाचे हात मला आनंद देणारे वाटतात. मी आत्तापर्यंत पर्वतांना स्पर्श करते.”
दरम्यान, अलीकडेच दीपिका ‘गहराइया (Gehraiyaan)’ या चित्रपटामध्ये दिसली. या चित्रपटामध्ये तिच्या सोबतच अनन्या पांडे (Ananya Pandey), सिद्धार्थ चतुर्वेदी (Siddharth Chaturvedi) आणि धैर्य कारवा (Dhairya Karwa) हे मुख्य भूमिके मध्ये होते.
Web Title :- Deepika Padukone Viral News | deepika padukone written poetry at the age of 12 now revealed my first and last attempt
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त