दीपिका पादुकोणला ‘या’ खेळाडूवरील बायोपिकमध्ये काम करण्यात ‘रस’

मुंबई : वृत्तसंस्था – वडिलांच आणि मुलीच नातं हे एक वेगळ असतं. मुलीच आपल्या वडिलांवर खूप प्रेम असत आणि वडिलांच देखील आपल्या मुलापेक्षा मुलीवर खूप प्रेम असतं. प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांचा खूप अभिमान असतो.

त्याचबरोबर तिला असे वाटते की, आपल्या वडिलांचे नाव मोठे व्हावे. आपल्या वडिलांना सन्मान मिळावा आणि प्रत्येक वडिलांची देखील इच्छा असती की, आपल्या मुलीचे नाव मोठे व्हावे आणि तिने असे काम करावे की, मला अभिमान वाटलं पाहिजे. असेच एक मुलीचे आणि वडिलांचे नाते आहे ते म्हणजे दीपिका पादुकोण आणि तिचे वडील बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण.

दीपिकाला आपल्या वडिलांचे नाव मोठे करायची खूप इच्छा आहे. दीपिकाचे वडील बॅडमिंटनपटू आहेत. आतापर्यंत त्यांनी भारताचे नाव जागतिक स्तरावर पोहचवले आहे. परंतु दीपिका बॅडमिंटनपटू नसली तरी ती बॉलीवूड सृष्टी मध्ये नावाजलेली अभिनेत्री आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाला खेळासंदर्भातील बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला.

तिला असा प्रश्न विचारण्यात आला की, कोणत्या खेळाडूवर बायोपिक काढावा. त्यावेळी ती ने न डगमगता आपल्या वडिलांचे बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोणचे नाव घेतले. व त्यांच्यावर बायोपिक काढण्यात यावा असे सांगितले. एवढंच नव्हे तर तिने सांगितले की, या चित्रपटात माझी काम करायची इच्छा आहे.

आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असाल तर… : नितेश राणे

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडें