कमिशन मिळाले नाही म्हणून काँग्रेसने राफेलचा सौदा केला नाही – निर्मला सीतारमन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कमिशन मिळाले नाही म्हणून काँग्रेसने राफेलचा सौदा केलाच नाही असा खोचक टोला देशाच्या संरक्षण मंत्री  निर्मला सीतारमन यांनी लगावला आहे. त्या शुक्रवारी लोकसभेत राफेल करारावर झालेल्या चर्चेत बोलत होत्या. राफेल निर्मितीचे कंत्राट तुम्ही एचएएलला का दिले नाही या काँग्रेसच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देताना तुम्ही व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरचे कंत्राट एचएएलला का दिले नाही असा सवाल केला आहे. एचएएल कडून तुम्हाला काय मिळणार नाही हे लक्षात येताच ऑगस्टा वेस्टलँडला कंत्राट देऊ केले आणि तुम्हाला हावे असणारे तुम्ही मिळवून घेतले असा आरोप निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

देशाच्या संरक्षणाचे डील करतो. संरक्षणामध्ये डीलिंग करत नाही असे म्हणत काँग्रेस सरकार कमिशन खाते असा टोला लगावला. तर निर्मला सीतारामन यांनी  मोदी सरकारचा माथा उजळ असल्याचा युक्ती केला आहे. तसेच काँग्रेसला राफेल करारात रसच नव्हता असा दावा देखील निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

निर्मला सीतारामन यांच्या भाषणाचे ठळक मुद्दे

– दोन स्क्वाड्रनची अत्यंत गरज निर्माण झाल्यावर  १९८२ साली भारताने सोव्हीएत युनियनकडून मिग-२३ ची दोन स्क्वाड्रन खरेदी केले आहेत. कारण तेव्हा पाकिस्तानने एफ-१६ विमाने अमेरिकेकडून खरेदी केलेली होती.
– १९८५ साली पुन्हा फ्रान्स कडून मिराज २००० हि दोन विमाने विकत घेण्यात आली ,१९८७ साली मिग २९ ची  दोन स्क्वाड्रन खरेदी केली.
– कमिशन मिळणार नाही म्हणून काँग्रेसने राफेल डील केली नाही.
– राफेल लढाऊ विमानाचा सौदा पचणार नाही म्हणून काँग्रेसने तो धूळ खात पाडला
– राफेर करारा बाबत काँग्रेस सरकारने नेहमीच उदासीनता दाखवली आहे.
– काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये राफेल डीलच्या मुद्द्यावर तोडगाच निघाला नव्हता
– सप्टेंबर २०१९ मध्ये राफेल लढाऊ विमान आपल्या हवाई दलाला मिळणार आहे.
– २०२२ पर्यंत सर्व राफेल लढावू विमाने हवाई दलात दाखल होणार आहेत.

राफेल करारात नमूद करण्यात आलेल्या अनेक मुद्द्यावर निर्मला सीतारामन यांनी इत्यंभूत माहिती लोकसभेला दिली आहे. निर्मला सीतारामन यांनी  काँग्रेसने केलेल्या आरोपांची चांगलीच चिरफाड केली. राफेल घोटाळ्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस मागे हटण्यास तयार नाही. अशातच भाजपच्या नेत्यांनी हि या आरोपांना फेटाळून लावले आहे. लोकांना काँग्रेसच्या आरोपांमध्ये विश्वास नाही असे हि भाजपचे नेते अधून मधून म्हणत असतात.